पाकिस्तानचा थयथयाट, भारताला धमकी; म्हणे, पाणी रोखले किंवा वळवले, तर युद्ध मानले जाईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 06:47 IST2025-05-14T06:44:29+5:302025-05-14T06:47:09+5:30
काश्मीर मुद्दा सोडविण्यासाठी अमेरिकेसह तिसऱ्या पक्षाच्या समर्थनाची गरज आहे. आम्ही चर्चेतून मुद्दे सोडवू इच्छित आहोत.

पाकिस्तानचा थयथयाट, भारताला धमकी; म्हणे, पाणी रोखले किंवा वळवले, तर युद्ध मानले जाईल
इस्लामाबाद : पाकिस्तानचे उप पंतप्रधान व विदेश मंत्री इशाक डार यांनी पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली. पाकचे पाणी रोखण्याचा किंवा वळवण्याचा प्रयत्न केल्यास ती युद्धाची कारवाई मानली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. रक्त आणि पाणी बरोबर वाहू शकत नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितल्यानंतर ही धमकी देण्यात आली आहे.
डार म्हणाले की, कधी कधी देशांना कठीण पर्याय निवडण्याची गरज पडते. तसाच पर्याय ९ मे रोजी निवडला. संपूर्ण प्रक्रिया दोन्ही बाजूंनी सन्मानजनक पद्धतीने पुढे जावी. चर्चेतून मुद्दे सोडवू इच्छित आहोत. तसेच काश्मीर मुद्दा सोडविण्यासाठी अमेरिकेसह तिसऱ्या पक्षाच्या समर्थनाची गरज आहे, असेही डारने म्हटले आहे.
केंद्र सरकारला 'राजकीय शिक्षा' दिली जाऊ नये
जम्मू: केंद्र सरकारने शांततामय मार्ग अवलंबिल्याबद्दल त्यांना 'राजकीय शिक्षा' दिली जाऊ नये आणि विरोधकांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाठिंबा द्यावा, असे पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.
४पीएम यूट्युब चॅनल ब्लॉक करण्याचा आदेश मागे
नवी दिल्ली: ७३ लाख सबस्क्रायबर असणाऱ्या ४पीएम चॅनलला ब्लॉक करण्याचा आदेश मागे घेण्यात आला आहे, असे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. केंद्र सरकारने हे चॅनल ब्लॉक केले होते.