पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 13:03 IST2025-06-08T13:02:48+5:302025-06-08T13:03:45+5:30

Pakistan News: पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशतवादाशी संबंधित समित्यांचे अध्यक्षपद मागितले होते.

Pakistan UNSC Demands: Pakistan falls on its face again; Demanded chairmanship of 4 committees in UN, got 'rejection' | पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'

पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'

Pakistan UNSC Demands: पहलगाम हल्ला आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्तान सतत आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर तोंडावर पडत आहे. आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारला मोठा धक्का बसला आहे. चार महत्त्वाच्या दहशतवादाशी संबंधित समित्यांचे अध्यक्षपद मिळावे ही पाकची मागणी इतर सदस्य देशांनी फेटाळून लावली आहे. 

एकमत नसल्यामुळे UNSC मध्ये विलंब
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला फक्त तालिबान निर्बंध समितीचे अध्यक्षपद आणि दहशतवाद विरोधी समितीचे (CTC) उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या मागण्यांमुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) एकमत होऊ शकले नाही. यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या समित्यांच्या विभाजनात सुमारे पाच महिने विलंब झाला. हे काम जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण व्हायला हवे होते.

UN चे सदस्य पाकिस्तानच्या मागण्यांबद्दल नाराज
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) उर्वरित सदस्य पाकिस्तानच्या मागण्यांबद्दल नाराज होते. पाकिस्तानचा दृष्टिकोन हट्टी आणि अन्याय्य असल्याचे मत इतर देशांनी व्यक्त केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका पाकिस्तानला कोणत्याही समितीचे अध्यक्षपद घेऊ इच्छित नव्हते. सरकारी सूत्रांनुसार, पाकिस्तानला मिळालेले CTC चे उपाध्यक्ष पद फक्त नावापुरते आहे. हे कोणत्याही महत्त्वाच्या जबाबदारीचे पद नाही.


 

Web Title: Pakistan UNSC Demands: Pakistan falls on its face again; Demanded chairmanship of 4 committees in UN, got 'rejection'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.