ईदच्या दिवशीच लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयात कमांडर बिलाल आरिफ सलाफीची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 13:38 IST2026-03-22T13:37:44+5:302026-03-22T13:38:50+5:30
Pakistan Terrorist Killed: अज्ञात हल्लेखोरांनी आधी गोळी झाडली, नंतर चाकू भोसकून हत्या केली.

ईदच्या दिवशीच लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयात कमांडर बिलाल आरिफ सलाफीची निर्घृण हत्या
Pakistan Terrorist Killed: पाकिस्तानमधीलदहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या मुख्यालयातच एका वरिष्ठ कमांडरची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. लाहोरजवळील मुरीदके येथील मरकज तैयबा संकुलात ईदच्या दिवशीच नमाजानंतर लष्कर कमांडर बिलाल आरिफ सलाफी याची गोळी झाडून आणि चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हत्या नेमकी कोणी केली आणि कशामुळे झाले, हे अद्याप समोर आले नाही.
ईद नमाजानंतर हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ईदच्या नमाजासाठी लष्कर मुख्यालयात संघटनेचे अनेक वरिष्ठ सदस्य उपस्थित होते. यामध्ये मौलाना अबू जर आणि मौलाना अब्दुल रहमान आबिद याचाही समावेश होता. नमाज संपल्यानंतर बिलाल आरिफ सलाफी प्रार्थना स्थळाबाहेर पडत असताना दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. एका व्यक्तीने जवळून गोळीबार केला, तर एका महिलेने चाकूने वार करून त्याची हत्या केली. हा हल्ला अत्यंत नियोजित होता, ज्यात त्याचा मृत्यू झाा.
प्रत्यक्षदर्शी व्हिडिओमुळे संशय वाढला
हल्ल्यानंतर इतर सदस्यांनी सलाफीला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सलाफी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो. त्याच व्हिडिओमध्ये लष्करचा प्रशिक्षण प्रमुख मौलाना अबू जर याला दुसऱ्या व्यक्तीने पकडून ठेवलेले दिसते.
🚨🚨 BIG BREAKING: Unknown attackers shot Lashkar-e-Taiba commander Bilal Arif Salafi at Markaz Taiba, Muridke, shortly after Eid prayers.#BreakingNews#Pakistan#Security#Developingpic.twitter.com/RitdTNOX7p
— Dhanjiv Pandey (@Dhanjivpandey) March 21, 2026
अंतर्गत सत्तासंघर्षाची शक्यता
या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार लष्कर-ए-तैयबामध्ये अंतर्गत गटबाजी किंवा सत्तासंघर्षामुळे ही हत्या झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यात एका महिलेचा सहभाग असल्याने हा बाहेरील हल्ला नसून संघटनेतील नियोजित अंतर्गत कारवाई असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
2005 पासून लष्करशी संबंध
बिलाल आरिफ सलाफी 2005 पासून लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होता. तो संघटनेसाठी निधी गोळा करण्याचे काम करत होता. या निधीचा वापर शस्त्रे खरेदी आणि दहशतवादी कारवायांसाठी केला जात असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तो मुरीदके येथील तैयबा कॉलनीमध्ये इतर वरिष्ठ कमांडरांसोबत राहत होता, यावरून संघटनेतील त्याचे महत्त्व स्पष्ट होते.