पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:49 IST2025-09-30T13:29:07+5:302025-09-30T13:49:12+5:30
Pakistan Bomb Blast News: हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. सुरक्षा दलांनी घटनास्थळाला वेढा घातला असून पुढील तपास सुरू आहे.

पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टा येथे आज, मंगळवारी दुपारी एका मोठ्या आत्मघाती हल्ल्याची घटना समोर आली आहे. क्वेट्टा शहरातील फ्रंटियर कॉर्प्स (Frontier Corps) मुख्यालयाजवळ एका आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला स्फोटकांनी उडवून दिले.
या हल्ल्यात आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोट इतका जोरदार होता की, परिसरात धुराचे लोट पसरले आणि मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातल्या सर्व रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. सुरक्षा दलांनी घटनास्थळाला वेढा घातला असून पुढील तपास सुरू आहे. हल्ल्यामध्ये मृत आणि जखमी झालेल्यांमध्ये किती जवान आणि किती सामान्य नागरिक आहेत, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.