दाऊदला खरंच विष देण्यात आलं होतं? पाकिस्तानने सोडलं मौन; भारताविषयी ओकली गरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 10:05 PM2023-12-21T22:05:52+5:302023-12-21T22:06:49+5:30

दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या बातम्या आल्या होत्या अन् नंतर फेटाळण्यात आल्या

Pakistan reaction on Dawood Ibrahim poisoned death rumors attack on India | दाऊदला खरंच विष देण्यात आलं होतं? पाकिस्तानने सोडलं मौन; भारताविषयी ओकली गरळ

दाऊदला खरंच विष देण्यात आलं होतं? पाकिस्तानने सोडलं मौन; भारताविषयी ओकली गरळ

Dawood Ibrahim poisoned, Pakistan, India: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या विषप्रयोगाच्या वृत्तावर पाकिस्तानने प्रथमच भाष्य केले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एका प्रश्नाच्या उत्तरात दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याच्या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. त्याऐवजी पाकिस्तानने भारतावरच, खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने दावा केला की, भारत त्यांच्या देशाविरुद्ध अपप्रचार करत आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम त्याच्या अनेक साथीदारांसह पाकिस्तानात विश्रांती घेत असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ने त्याला आपल्या संरक्षणात ठेवले असल्याचे वृत्त काही वेळ प्रसारमाध्यमात आले होते. मात्र सध्या दाऊदच्या मुद्द्यावरून पाकिस्तान भारतावरच आरोप करताना दिसत आहे.

पाकिस्तानने दाऊदबद्दल काय म्हटले?

वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकार मारियाना बाबर यांनी परराष्ट्र कार्यालयाचा हवाला देत ट्विटमध्ये लिहिले आहे की, सर्वांनी हे लक्षात ठेवावे की भारताला पाकिस्तान विरुद्ध खोट्या बातम्या आणि आरोपांचा प्रचार करण्याची सवय आहे. असे अनेक पुरावे समोर आले आहेत, ज्यामध्ये भारत नियमितपणे खोट्या बातम्या देत आहे. खोट्या बातम्या पसरवून पाकिस्तानला मुद्दाम लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आम्ही अशा खोट्या बातम्यांवर भाष्य करू इच्छित नाही, ज्यांचा पाकिस्तानला लक्ष्य करण्यासाठी प्रचार केला जातो, असे EU डिसइन्फो लॅबने म्हटले आहे.

दाऊदची तब्येत ठणठणीत असल्याचा छोटा शकीलचा दावा

दरम्यान, दाऊद इब्राहिमच्या मृत्यूचे दावे त्याचा जवळचा सहकारी छोटा शकीलने फेटाळले आहेत. छोटा शकीलने सोशल मीडियावर सुरू असलेले सर्व दावे फेटाळून लावत दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची बातमी निराधार असल्याचे म्हटले. न्यूज 10 मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, शकीलने सांगितले की, दाऊदच्या मृत्यूच्या बातम्या अनेकदा त्याच्या वाढदिवसाला येतात पण तो पूर्णपणे निरोगी आहे.

भारतीय सुरक्षा यंत्रणांनीही दिला नकार

भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याच्या आणि रुग्णालयात दाखल केल्याच्या बातम्याही खोट्या असल्याचं म्हटलं आहे. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले. अधिकारी म्हणाला की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद पाकिस्तानात इब्राहिमचा खास मुलगा शकील पाकिस्तानात त्याच्या घरी आहे, ज्यामुळे ही बातमी खोटी असल्याची कल्पना निर्माण झाली.

Web Title: Pakistan reaction on Dawood Ibrahim poisoned death rumors attack on India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.