'नरेंद्र मोदी सत्तेत आले तरच शांततेवर चर्चा होऊ शकते'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 09:03 AM2019-04-10T09:03:28+5:302019-04-10T09:12:12+5:30

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे.

Pakistan Prime Minister Imran Khan says greater chance of peace with India if Modi is re-elected | 'नरेंद्र मोदी सत्तेत आले तरच शांततेवर चर्चा होऊ शकते'

'नरेंद्र मोदी सत्तेत आले तरच शांततेवर चर्चा होऊ शकते'

Next
ठळक मुद्देपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास चर्चा होणं अशक्य असल्याचंही मत यावेळी व्यक्त केलं आहे. इम्रान खान यांनी एक निवडणुकीआधीचे आणि एक निवडणुकीनंतरचे असे दोन नरेंद्र मोदी पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं आहे. 

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास चर्चा होणं अशक्य असल्याचंही मत यावेळी व्यक्त केलं आहे. राजकीय पक्षांकडून टीका होईल या भीतीने काँग्रेस शांततेवर चर्चा करणार नाही असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. यासोबतच इम्रान खान यांनी एक निवडणुकीआधीचे आणि एक निवडणुकीनंतरचे असे दोन नरेंद्र मोदी पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं आहे. 

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते.  एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हल्ला परतवून लावण्यास सज्ज असलेल्या भारतीय लढाऊ विमानांनी हा हल्ला परतवून लावला होता. पण त्यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडताना अपघात होऊन भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यानंतर जिनिव्हा करारातील तरतुदींनुसार पाकिस्तानने त्यांची मुक्तता केली होती. या सर्व घडामोडींनंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास शांततेच्या चर्चेला प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलं आहे.

'भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं. जर आम्ही उत्तर दिलं नसतं तर लोकांकडून आमच्यावर प्रचंड टीका झाली असती. जर उत्तर दिलं नसतं तर कोणतंही सरकार पाकिस्तानात टिकू शकत नाही' असं काही ठराविक प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्रान खान यांनी म्हटलं आहे. तसेच दहशतवाद संपवण्यासाठी  प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. एका वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्याने बाराहून अधिक दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरसंबंधी विचारलं असता, तो खरचं अंडरग्राऊंड झाला आहे. तो सध्या नेतृत्व करत नाही आहे असं त्यांनी सांगितलं.

17 व्या लोकसभेसाठी भारतातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

इम्रान खान यांचा मोदींवर हल्लाबोल, निवडणूक जिंकण्यासाठी F-16 विमानाच्या मुद्द्याचा वापर 

पाकिस्तानच्या ताफ्यात असलेली सगळी अमेरिकी एफ-16 विमाने सुरक्षित असल्याचा अमेरिकन मासिकाने केलेला दावा भारतीय हवाई दलाने फेटाळून लावला होता. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारीला पाकिस्तानने केलेला प्रतिहल्ला परतवून लावत असताना विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ-16 विमान पाडले होते. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या मुद्द्यावर ट्वीट करत मोदींवर हल्लाबोल केला होता. सत्याचा नेहमीच विजय होतो, हीच खरी नीती आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून आणि पाकिस्तानचं एफ 16 विमान पाडण्याच्या मुद्द्यांवरूनच भाजपाला निवडणुका जिंकायच्या आहेत. परंतु अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोदींचे हे प्रयत्न हाणून पाडले आहेत. पाकिस्तानच्या ताब्यातील कोणतंही एफ 16 विमान गायब नसल्याचं अमेरिकेनं सांगितल्याची आठवणही इम्रान खान यांनी करून दिली होती.

भारताच्या एअरस्ट्राइकनंतर इम्रान खानकडून शांततेवर प्रवचन, दिले चर्चेचे निमंत्रण

पुलवामा येथील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या जबरदस्त एअर सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा शांततेचा राज आळवला होता. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही सशस्त्र देश आहेत, युद्धामुळे कुणाचेही भले होणार नाही. त्यामुळे आपल्याला चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावे लागतील, आम्ही चर्चेस तयार आहोत, असा दावा इम्रान खान यांनी केला होता. ''भारताने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून आम्ही कारवाई केली आहे. मात्र युद्ध हे कुठल्याही गोष्टीचा पर्याय ठरू शकत नाही. भारत आणि पाकिस्तान दोघेही शस्त्रसज्ज देश आहेत. त्यामुळे युद्ध झाल्यास गंभीर परिणाम होतील. त्यामुळे दोन्ही देशांना युद्ध परवडणार नाही'' असं इम्रान खान यांनी म्हटलं होतं.  
 

Web Title: Pakistan Prime Minister Imran Khan says greater chance of peace with India if Modi is re-elected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.