सिंथिया डी रिचीसोबत पाक पंतप्रधान इम्रान खान यांना करायचा होता सेक्स; धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 08:15 IST2020-06-07T08:14:31+5:302020-06-07T08:15:35+5:30

तसेच सिंथियाने रहमान अलीबाबत कोणताही उल्लेख केला नसल्याचं अली सलीम यांनी सांगितले.

Pakistan PM Imran Khan wanted to have sex with Cynthia de Richie | सिंथिया डी रिचीसोबत पाक पंतप्रधान इम्रान खान यांना करायचा होता सेक्स; धक्कादायक खुलासा

सिंथिया डी रिचीसोबत पाक पंतप्रधान इम्रान खान यांना करायचा होता सेक्स; धक्कादायक खुलासा

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रहमान मलिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी अमेरिकन महिला सिंथिया डी रिचीवरुन आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पाकिस्तानी टीव्ही होस्ट अली सलीमने दावा केला आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सिंथियासोबत सेक्स करण्याची इच्छा होती असं तिनेच मला सांगितलं. सलीम अलीच्या या दाव्यानंतर पाकिस्तानात खळबळ माजली आहे.

याबाबत सलीम अली म्हणाला की, मी सिंथियाच्या खूप जवळ होतो, आम्ही एकाच रुममध्ये राहिलो होतो,  त्यावेळी सिंथियाने तिच्या काही गोष्टी मला सांगितल्या, त्यात इम्रान खान यांनी तिच्यासोबत सेक्स करण्याबाबतही सांगितलं होतं. यापूर्वी सिंथियाने पाकिस्तान पीपल्स पार्टी(पीपीपी) नेता रहमान मलिक यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात भूकंप झाला होता. मात्र पीपीपीने सिंथियाने केलेले आरोप तथ्यहिन आणि लज्जास्पद आहेत असं सांगत फेटाळून लावले होते.

तसेच रहमान मलिक यांच्याबद्दल कोणतीच सहानुभूती नाही, बेनजीर भुट्टो यांची हत्या झाली त्यावेळी रहमान बेनजीर यांचे सुरक्षा इंचार्ज होते, असं असतानाही आसिफ अली जरदारीने त्यांना गृहमंत्री बनवले, तसेच सिंथियाने रहमान अलीबाबत कोणताही उल्लेख केला नसल्याचं अली सलीम यांनी सांगितले.

कोण आहे सिंथिया?

सिंथिया पाकिस्तान प्रेमी, साहसी ट्रेकर, चित्रपट निर्माते असल्याचा दावा करते. ती बऱ्याच काळापासून इस्लामाबादमध्ये राहत आहे. सुरुवातीला पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्यांशी तिचे चांगले संबंध होते पण नंतर परिस्थिती बिघडली. अलीकडेच तिने एकामागून एक ट्विट करून पीपीपीवर निशाणा साधला आहे.

Web Title: Pakistan PM Imran Khan wanted to have sex with Cynthia de Richie