Pakistan to merge Gilgit Baltistan with the mainland | गिलगिट-बाल्टिस्तान पाकमध्ये विलीन

गिलगिट-बाल्टिस्तान पाकमध्ये विलीन

इस्लामाबाद : कोरोना विषाणूच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या अस्थितरतेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान मुख्यधारेत म्हणजेच पाकिस्तानमध्ये विलीन करून तो पूर्ण स्वरूपातील प्रांत करण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानचे फेडरल मंत्री अली अमिन गंदापूर यांनी नुकतेच पाकिस्तान सरकारने गिलगिट-बाल्टिस्तानचा दर्जा बदलण्याचा निर्णय घेतल्याचे व पंतप्रधान इम्रान खान हे त्याबाबतची औपचारिक घोषणा करण्यासाठी त्या भागाला लवकरच भेट देतील, असे म्हटले होते.

पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तानवर जी वैधानिक व्यवस्था लादली ती पाहता दोन गोष्टी आहेत. एक - त्या प्रांतावर प्रशासन असलेले कायदे आणि दोन- त्या प्रांताचे प्रशासन सरकारच्या संस्थांकडून. पाकिस्तान सरकार गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतावर तात्पुरत्या अध्यादेशांद्वारे सत्ता राबवत आहे, ती त्याची स्वायत्तता अखंड ठेवून हक्कांच्या युक्तिवादांना कायदेशीर स्वरूप यावे म्हणून फ्रंटियर क्राईम रेग्युलेशन्सच्या माध्यमातून त्या प्रांतावर राज्य करण्यास सुरुवात केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pakistan to merge Gilgit Baltistan with the mainland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.