पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 14:41 IST2026-04-08T14:38:25+5:302026-04-08T14:41:46+5:30

Pakistan Mediation Praise Countries : काही तासांपूर्वीच "इराणचे अस्तित्व मिटवून टाकू" अशी धमकी देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक घेतलेल्या या 'यू-टर्न'ने अनेक देश थक्क झाले असले तरी, या शांतता प्रक्रियेत पाकिस्तानने बजावलेल्या कूटनीतिक भूमिकेची जगभरातून प्रशंसा होत आहे.

Pakistan Mediation Praise: US-Iran ceasefire welcomed by the world! Some praised Pakistan's mediation; Australia criticizes Trump's language | पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका

पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका

अमेरिका आणि इराण दरम्यान जाहीर झालेल्या दोन आठवड्यांच्या 'सीझफायर' निर्णयाचे जागतिक समुदायाने जोरदार स्वागत केले आहे. काही तासांपूर्वीच "इराणचे अस्तित्व मिटवून टाकू" अशी धमकी देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक घेतलेल्या या 'यू-टर्न'ने अनेक देश थक्क झाले असले तरी, या शांतता प्रक्रियेत पाकिस्तानने बजावलेल्या कूटनीतिक भूमिकेची जगभरातून प्रशंसा होत आहे.

मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी या कराराचे स्वागत करताना पाकिस्तानच्या भूमिकेला 'साहसी कूटनीती' असे संबोधले आहे. "पाकिस्तानने कोणत्याही भीतीशिवाय सर्व पक्षांशी केलेली चर्चा मुस्लिम एकजूट आणि आंतरराष्ट्रीय जबाबदारीचा उत्तम नमुना आहे," असे इब्राहिम यांनी म्हटले आहे. न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांनीही पाकिस्तानसह तुर्की आणि इजिप्तचे आभार मानले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा ट्रम्पविरोधी राग...
ऑस्ट्रेलियाने या कराराचे स्वागत केले असले तरी, पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी ट्रम्प यांच्या प्रक्षोभक भाषेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "एका राष्ट्राध्यक्षाने अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही, यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण होते," असे अल्बनीज यांनी म्हटले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणे ही जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जागतिक प्रतिक्रिया एका नजरेत

  • कझाकस्तान: पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या मध्यस्थीने हे शक्य झाल्याचे सांगत त्यांनी कौतुक केले.
  • जपान आणि दक्षिण कोरिया: या सकारात्मक पावलाचे स्वागत करत होर्मुझमध्ये जहाजांची सुरक्षित वाहतूक सुरू होण्याची आशा व्यक्त केली.
  • संयुक्त राष्ट्र : सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही पक्षांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचे आणि मानवी पीडा कमी करण्यासाठी हिंसा कायमची थांबवण्याचे आवाहन केले आहे.

Web Title : अमेरिका-ईरान युद्धविराम का वैश्विक स्वागत; पाकिस्तान की मध्यस्थता की प्रशंसा

Web Summary : विश्व ने अमेरिका-ईरान युद्धविराम का स्वागत किया, पाकिस्तान की कूटनीति की सराहना की। मलेशिया ने पाकिस्तान की साहसिक भूमिका की सराहना की। ऑस्ट्रेलिया ने समझौते का स्वागत करते हुए भी ट्रम्प की भाषा की आलोचना की। संयुक्त राष्ट्र ने स्थायी शांति का आग्रह किया।

Web Title : Global Welcome for US-Iran Ceasefire; Praise for Pakistan's Mediation

Web Summary : World hails US-Iran ceasefire, praising Pakistan's diplomacy. Malaysia lauds Pakistan's bold role. Australia criticizes Trump's rhetoric despite welcoming the agreement. UN urges lasting peace.