पाकिस्तानचा अफगाणिस्तानात रत्रीतूनच मोठा हवाई हल्ला; 15 जणांचा मृत्यू; मृतांत महिला मुलांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 09:11 IST2024-12-25T09:09:49+5:302024-12-25T09:11:28+5:30

पाकिस्तानने केलेल्या या या एअर स्ट्राइकमध्ये आतापर्यंत किमान 15 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. यात महिला आणि लहाण मुलांचाही समावेश असल्याचे समजते...

Pakistan launches major airstrike in afghanistan at night; Many killed; women and children among the dead | पाकिस्तानचा अफगाणिस्तानात रत्रीतूनच मोठा हवाई हल्ला; 15 जणांचा मृत्यू; मृतांत महिला मुलांचाही समावेश

पाकिस्तानचा अफगाणिस्तानात रत्रीतूनच मोठा हवाई हल्ला; 15 जणांचा मृत्यू; मृतांत महिला मुलांचाही समावेश

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात दहशतवादी  संघटनांमुळे सध्या तणावाची स्थिती आहे. यातच आता पाकिस्ताननेअफगाणिस्तानवर मोठा हवाई हल्ला केल्याचे वृत्त आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हा हल्ला मंगळवारी रात्री करण्यात आला. अरब न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानने केलेल्या या या एअर स्ट्राइकमध्ये आतापर्यंत किमान 15 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. यात महिला आणि लहाण मुलांचाही समावेश असल्याचे समजते.

एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू -
पाकिस्तानकडून हा हल्ला पाकिस्तानी तहरीक-ए-तालीबानचे जे दहशतवादी अफगाणिस्तानात लपून बसले आहेत, त्यांना निशाणा बनवण्यासाठी करण्यात आला. माध्यमांतील वृत्तांनुसार, या हल्ल्यात लामनसह एकूण सात गावांना टार्गेट करण्यात आले. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील 5 जणांचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यात अफगाणिस्तानात मोठे नुकसान झाले आहे. यामुळ भविष्यात परिसरात आणखी तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

काय म्हणाले पाकिस्तानी संरक्षण अधिकारी? -
पाकिस्तानने मंगळवारी केलेल्या हवाई हल्ल्यांत अफगाणिस्तानातील पाकिस्तानी तालिबानच्या अनेक संशयित ठिकाणांना निशाना बनवण्यात आले. त्यांचे एक ट्रेनिंग सेंटरही नष्ट करण्यात आले आहे. तसेच बंडखोरांनाही मारण्यात आले आहे. या बॉम्बिंगसाठी पाकिस्तानी जेटचा वापर करण्यात आला. आम्ही पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पक्तिका प्रांतातील काही भागांत हे हल्ले केले. त्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर अरब न्यूजला ही माहिती दिली.

अफगाणिस्तानची प्रतिक्रिया - 
अफगाणिस्तान संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच, या हवाई हल्ल्यांत महिला आणि लहाण मुलांसह नागरिकांना निशाणा बनवण्यात आले. “अफगाणिस्तानचे इस्लामिक अमिरात, हे आंतरराष्ट्रीय सिद्धांताच्या विरुद्ध क्रूर कृत्य मानते आणि याचा तीव्र निषेध करते,” असे मंत्रालयाने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, यापूर्वीही मार्च महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानातील सीमावर्ती भागांत तालीबानच्या ठिकानांवर हल्ला केला होता.
 

Web Title: Pakistan launches major airstrike in afghanistan at night; Many killed; women and children among the dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.