शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 13:41 IST

आयएसआय नेपाळी नागरिकांचा वापर करून भारतीय लष्करी संस्थांवर हेरगिरी करत असल्याचे उघड झाले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविराम हे सगळं झाल्यानंतरही पाकिस्तान आपल्या 'नापाक' कारवाया थांबवण्याचं नाव घेत नाहीये. आता पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा नवा कट उघड झाला आहे. भारताची हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानने आता नेपाळचा मार्ग निवडल्याचे समोर आले आहे.  

अशी काही कागदपत्र समोर आली आहेत, ज्यामुळे पाकिस्तानच्या आयएसआयच्या भारतात घुसखोरी करणाऱ्यांचे मोठे जाळे उघड झाले आहे. हे नेटवर्क पश्चिम आशियापासून नेपाळ आणि भारतापर्यंत पसरलेले आहे. आता आयएसआय नेपाळी नागरिकांचा वापर करून भारतीय लष्करी संस्थांवर हेरगिरी करत असल्याचे उघड झाले आहे.

दिल्ली पोलिसांनी केली अटकदिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने २००८पासून आयएसआयसाठी काम करणाऱ्या नेपाळी नागरिक अन्सारुल मियां अन्सारीला अटक केली. त्याच्याकडून भारतीय सैन्याची गोपनीय कागदपत्रे, तैनाती योजना आणि प्रशिक्षण नियमावली जप्त करण्यात आली. ही सगळे कागदपत्र तो पाकिस्तानला पाठवणार होता. पोलीस चौकशी दरम्यान, अन्सारीने कबूल केले की, तो पाकिस्तानी एजंट यासीरच्या सुचनेवर हे काम करत होता. 

इतकंच नाही तर, सोशल मीडिया आणि मेसेजद्वारे तो पाकिस्तानी एजंटशी संवाद साधत होता. अटक करण्यापूर्वी त्याने काही संवेदनशील माहिती असणारी सीडी तोडून फेकली होती. तपासात असेही समोर आले आहे की, अन्सारीचे भारतात अनेक सहकारी आहेत, ज्यामध्ये झारखंडच्या अखलाक आझमचे नाव देखील सामील आहे.

आयएसआयची नेपाळमधून हेरगिरीदिल्ली पोलिसांनी आपल्या अहवालात असे म्हटले आहे की, गुप्तचर यंत्रणांना अशी माहिती मिळाली होती की, एक नेपाळी नागरिक गोरखपुर मार्गे भारतात येत आहे आणि या व्यक्तीकडे भारतीय सैन्याशी संबंधित काही गोपनीय कागदपत्रे आहेत. यानंतर गोपाळपूर गावात सापळा रचण्यात आला आणि अन्सारीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक लॅपटॉप, प्रिंटर आणि गोपनीय माहिती असलेली कागदपत्रे, तसेच १९८२ मध्ये छापलेले 'फायटिंग इन बिल्ट अप एरियाज' शीर्षक असलेले एक पत्रक जप्त करण्यात आले.  

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुलीचौकशीदरम्यान, अन्सारीने कबूल केले की तो नेपाळमार्गे भारतात येत असे आणि दिल्लीतील पाकिस्तानी एजंट्सी भेट घेत असे. त्याच्या मोबाईलमधून जप्त केलेले व्हॉट्सअॅप चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि पाकिस्तानी नंबरची चौकशी केली जात आहे. यामध्ये अनेक संशयास्पद नंबर समाविष्ट आहेत. आरोपीने असेही सांगितले की, त्याने दिल्ली आयएसबीटी येथे 'पिंटू' नावाच्या व्यक्तीकडून एक सीडी घेतली होती, जी गोपनीय माहितीने भरलेली होती. परंतु, पोलीस कारवाईचा इशारा मिळताच त्याने ती सीडी फोडली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानISIआयएसआयNepalनेपाळ