पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 13:41 IST2025-07-03T13:31:50+5:302025-07-03T13:41:24+5:30

आयएसआय नेपाळी नागरिकांचा वापर करून भारतीय लष्करी संस्थांवर हेरगिरी करत असल्याचे उघड झाले आहे.

Pakistan isi carrying out espionage through Nepal network exposed | पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...

पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...

पहलगाम दहशतवादी हल्ला, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविराम हे सगळं झाल्यानंतरही पाकिस्तान आपल्या 'नापाक' कारवाया थांबवण्याचं नाव घेत नाहीये. आता पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा नवा कट उघड झाला आहे. भारताची हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानने आता नेपाळचा मार्ग निवडल्याचे समोर आले आहे.  

अशी काही कागदपत्र समोर आली आहेत, ज्यामुळे पाकिस्तानच्या आयएसआयच्या भारतात घुसखोरी करणाऱ्यांचे मोठे जाळे उघड झाले आहे. हे नेटवर्क पश्चिम आशियापासून नेपाळ आणि भारतापर्यंत पसरलेले आहे. आता आयएसआय नेपाळी नागरिकांचा वापर करून भारतीय लष्करी संस्थांवर हेरगिरी करत असल्याचे उघड झाले आहे.

दिल्ली पोलिसांनी केली अटक
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने २००८पासून आयएसआयसाठी काम करणाऱ्या नेपाळी नागरिक अन्सारुल मियां अन्सारीला अटक केली. त्याच्याकडून भारतीय सैन्याची गोपनीय कागदपत्रे, तैनाती योजना आणि प्रशिक्षण नियमावली जप्त करण्यात आली. ही सगळे कागदपत्र तो पाकिस्तानला पाठवणार होता. पोलीस चौकशी दरम्यान, अन्सारीने कबूल केले की, तो पाकिस्तानी एजंट यासीरच्या सुचनेवर हे काम करत होता. 

इतकंच नाही तर, सोशल मीडिया आणि मेसेजद्वारे तो पाकिस्तानी एजंटशी संवाद साधत होता. अटक करण्यापूर्वी त्याने काही संवेदनशील माहिती असणारी सीडी तोडून फेकली होती. तपासात असेही समोर आले आहे की, अन्सारीचे भारतात अनेक सहकारी आहेत, ज्यामध्ये झारखंडच्या अखलाक आझमचे नाव देखील सामील आहे.

आयएसआयची नेपाळमधून हेरगिरी
दिल्ली पोलिसांनी आपल्या अहवालात असे म्हटले आहे की, गुप्तचर यंत्रणांना अशी माहिती मिळाली होती की, एक नेपाळी नागरिक गोरखपुर मार्गे भारतात येत आहे आणि या व्यक्तीकडे भारतीय सैन्याशी संबंधित काही गोपनीय कागदपत्रे आहेत. यानंतर गोपाळपूर गावात सापळा रचण्यात आला आणि अन्सारीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक लॅपटॉप, प्रिंटर आणि गोपनीय माहिती असलेली कागदपत्रे, तसेच १९८२ मध्ये छापलेले 'फायटिंग इन बिल्ट अप एरियाज' शीर्षक असलेले एक पत्रक जप्त करण्यात आले.  

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली
चौकशीदरम्यान, अन्सारीने कबूल केले की तो नेपाळमार्गे भारतात येत असे आणि दिल्लीतील पाकिस्तानी एजंट्सी भेट घेत असे. त्याच्या मोबाईलमधून जप्त केलेले व्हॉट्सअॅप चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि पाकिस्तानी नंबरची चौकशी केली जात आहे. यामध्ये अनेक संशयास्पद नंबर समाविष्ट आहेत. आरोपीने असेही सांगितले की, त्याने दिल्ली आयएसबीटी येथे 'पिंटू' नावाच्या व्यक्तीकडून एक सीडी घेतली होती, जी गोपनीय माहितीने भरलेली होती. परंतु, पोलीस कारवाईचा इशारा मिळताच त्याने ती सीडी फोडली.

Web Title: Pakistan isi carrying out espionage through Nepal network exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.