"...तर पाकचे तुकडे होतील, आमचे ३ लाख जवान"; शिया धर्मगुरूंची असीम मुनीर यांना थेट वॉर्निंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 22:37 IST2026-03-22T22:36:37+5:302026-03-22T22:37:06+5:30

आगीत तेल ओतण्याचे काम लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या कथित वक्तव्याने केले. मुनीर यांनी शियांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

"...Pakistan is divided, our 3 lakh soldiers will be destroyed"; Shia cleric's direct warning to Asim Munir | "...तर पाकचे तुकडे होतील, आमचे ३ लाख जवान"; शिया धर्मगुरूंची असीम मुनीर यांना थेट वॉर्निंग

"...तर पाकचे तुकडे होतील, आमचे ३ लाख जवान"; शिया धर्मगुरूंची असीम मुनीर यांना थेट वॉर्निंग

इस्लामाबाद - पाकिस्तानातील प्रमुख शिया धर्मगुरू शेख जावेद यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना एक थेट वॉर्निंग दिली आहे. ज्यामुळे पाकिस्तान सरकारची झोप उडाली आहे. पाकिस्तानात ८ लाख सैन्यांमध्ये ३ लाख शिया जवान आहेत. तुम्ही शिया समाजाला इराणला जाण्यास सांगून त्यांचा अपमान केला आहे. तुम्ही माफी मागा अन्यथा याचे परिणाम भोगायला तयार राहा. जर ३ लाख शिया सैन्यांनी विद्रोह केला तर पाकिस्तानचे तुकडे होण्यापासून कुणी रोखू शकत नाही असं शेख जावेद यांनी म्हटलं आहे.  

पाकिस्तानात शिया समुदायाची लोकसंख्या २० टक्के इतकी आहे. मागील काही दशकांपासून शिया समुदाय कट्टरपंथी सुन्नी संघटना लश्कर ए झांगवी आणि सिपाहे सहाबा टार्गेट करत आहेत. पाराचिनार आणि गिलगित बलिस्तानसारख्या भागात शिया समुदायात कायम रक्तपात होत राहतो. पाकिस्तानी गुप्त यंत्रणा, लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआय आम्हाला सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरली आहे आणि किंबहुना काही वेळा ते कट्टरपंथींचे अप्रत्यक्ष समर्थन करतात असा आरोप शिया समुदायाने बऱ्याच काळापासून केला आहे.

का भडकली आग?

आगीत तेल ओतण्याचे काम लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या कथित वक्तव्याने केले. मुनीर यांनी शियांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांना "इराणला जा" असं बजावले. पाकिस्तानमधील शिया इतर कोणत्याही नागरिकाप्रमाणेच आपल्या भूमीवर प्रेम करतात. त्यांचा लक्षणीय लष्करी सहभाग याचाच पुरावा आहे. त्यामुळे देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, लष्करप्रमुखांकडून आलेली अशी वक्तव्ये सीमेवर पहारा देणाऱ्या लाखो शिया सैनिकांच्या हौतात्म्याचा आणि निष्ठेचा थेट अपमान होता. त्यामुळे शिया धर्मगुरू शेख जावेद यांनी मुनीर यांच्यावर पलटवार केला आहे. 

जर ३ लाख सैनिकांनी बंड केले तर काय होईल?

दरम्यान, ८ लाख सैनिकांपैकी ३ लाख सैनिक शिया आहेत, हा आकडा कोणत्याही लष्करप्रमुखाला घाम फोडणारा आहे. जरी लष्कर अधिकृतपणे जातीय आकडेवारी जाहीर करत नसले तरी हे खरे आहे की नॉर्दर्न लाइट इन्फंट्रीसारख्या अनेक पाकिस्तानी लष्करी रेजिमेंटमध्ये लक्षणीय संख्येने शिया सैनिक आणि अधिकारी आहेत. जर आसिम मुनीर यांनी माफी मागितली नाही आणि परिस्थिती चिघळली तर हे बंड पाकिस्तानसाठी खूप धोकादायक ठरू शकते असा शेख जावेद यांचा दावा आहे.

१९७१ च्या इतिहासाची पुनरावृत्ती?

१९७१ मध्ये पाकिस्तानच्या शासकांनी पूर्व पाकिस्तानातील (आताचे बांगलादेश) बंगाली लोकांना दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून वागणूक दिली. याचा परिणाम काय झाला? पाकिस्तानचे दोन भागांमध्ये विभाजन झाले. आज पाकिस्तानची परिस्थिती १९७१ पेक्षाही वाईट आहे. बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्यासाठी युद्ध आधीच सुरू झाले आहे, जिथे बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) दररोज पाकिस्तानी सैनिकांना ठार मारत आहे. खैबर पख्तुनख्वामध्ये (केपीके), तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) एक समांतर सरकार स्थापन केले आहे. जर सैन्यात शिया बंड झाले तर गिलगिट-बाल्टिस्तान आणि खुर्रम एजन्सीसारखे शियाबहुल प्रदेश इस्लामाबादपासून स्वतःला तात्काळ वेगळे घोषित करू शकतात.

Web Title : शिया धर्मगुरु की पाकिस्तान को चेतावनी: 3 लाख सैनिक पाकिस्तान तोड़ सकते हैं।

Web Summary : शिया धर्मगुरु शेख जावेद ने पाकिस्तानी सेना प्रमुख जनरल असीम मुनीर को चेतावनी दी है कि शिया सैनिकों का अपमान विद्रोह और पाकिस्तान के विघटन का कारण बन सकता है। उन्होंने दावा किया कि यदि उनकी देशभक्ति पर सवाल उठाया गया तो 3 लाख शिया सैनिक विद्रोह कर सकते हैं, जिससे 1971 के विभाजन की पुनरावृत्ति हो सकती है।

Web Title : Shia cleric warns Pakistan: 300,000 soldiers could break Pakistan.

Web Summary : Shia cleric Sheikh Javed warned Pakistan's army chief, General Asim Munir, that insulting Shia soldiers could lead to a revolt and Pakistan's disintegration. He claims 300,000 Shia soldiers might rebel if their patriotism is questioned, potentially repeating the 1971 partition.