शहरं
Join us  
Trending Stories
1
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
2
SA vs BAN : WHAT A MATCH! माफक लक्ष्य पण संघर्ष मोठा; गोलंदाजांची कमाल, अखेर बांगलादेश चीतपट
3
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
4
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
5
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
6
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
7
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
8
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
9
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
10
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
11
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
12
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
13
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
14
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
15
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
16
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
17
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
18
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
19
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
20
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त

कोण आहे जैश-ऐ-अदल? इराणने पाकिस्तानात का केली एअर स्ट्राईक? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 6:44 PM

इराणने पाकिस्तानात घुसून जैश-ऐ-अदलच्या ठिकाणांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Pakistan Iran : भारताचा शेजारील देश पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांसाठी सुरक्षित देश राहिला आहे. पाकिस्तान थेटपणे मान्य करत नसला तरी, ते नेहमी दहशतवादी संघटनांना निधी पुरवतात. पण आता हेच दहशतवादी पाकिस्तानसाठीच अडचणीचे ठरत आहेत. अलीकडेच इराणने पाकिस्तानच्या भूमीवर हवाई हल्ला केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (16 जानेवारी) रात्री इराणने पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील सुन्नी दहशतवादी संघटना 'जैश-ऐ-अदल'च्या ठिकाणांवर मिसाइल आणि ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. या कारवाईचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

जाणून घ्या जैश-ए-अदल संघटनेबद्दल...जैश-ऐ-अदल याआधी जागतिक दहशतवादी संघटना जुंदल्लाहचा एक भाग होती. जैश-ऐ-अदल म्हणजे 'न्यायाची सेना'. ही सुन्नी सलाफी फुटीरतावादी दहशतवादी संघटना आहे. जैश-ऐ-अदल या दहशतवादी संघटनेचे मुख्य ठिकाण पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये आहे. 2012 पासून या दहशतवादी संघटनेचे पाकिस्तानात मजबूत अस्तित्व आहे.

इराणच्या हल्ल्याचे कारण काय?इराण हा शिया बहुसंख्य देश आहे. पाकिस्तानातील सुमारे 95% लोक सुन्नी आहेत, त्यामुळे पाकिस्तानातील सुन्नी संघटना इराणला विरोध करतात. याशिवाय बलुचिस्तानची दहशतवादी संघटना जैश-अल-अदल इराणच्या सीमेत घुसून तेथील लष्करावर अनेकदा हल्ले करते. या दहशतवादी संघटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी इराणने पाकिस्तानला अनेकदा इशारा दिला आहे. जैश-ऐ-अदलचे बहुतांश दहशतवादी इतर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांमधून आलेले आहेत. 

सिस्तान प्रांतात इराणची पाकिस्तानशी 959 किमी लांबीची सामायिक सीमा आहे. इराणमधील शिया समुदाय येथे राहतो. इराणच्या सीमावर्ती प्रांतांमध्ये जैश-ऐ-अदलशी यापूर्वीही चकमक झाली आहे. पण आता इराणने पाकिस्तानी भूमीवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले करणे ठरवले आहे. गेल्या महिन्यात सिस्तान बलुचिस्तानमधील इराणी पोलिस ठाण्यावर जैशने केलेल्या हल्ल्याचा हा बदला असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :IranइराणPakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीयwarयुद्धBombsस्फोटकेBlastस्फोट