पाकिस्तान आधीच आर्थिक संकटात आहे. आता त्यांची पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स ही दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. यामुळे आता पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. २०२५ च्या अखेरीस पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स विकण्यासाठी पाकिस्तान सरकारने प्रयत्न वाढवले आहेत. पीआयए तोट्यात चालली आहे. गेल्या वर्षी सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी विकण्याचा सरकारचा प्रयत्न अयशस्वी झाला.
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
मिळालेल्या माहितीनुसार, खाजगीकरण आयोग मंडळाने मंगळवारी चार स्थानिक कंपन्यांना विमान कंपनीच्या अधिग्रहणासाठी बोली लावण्यास पात्र घोषित केले. यापैकी तीन कंपन्या सिमेंट व्यवसाय करत आहेत.
पीआयए अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात
सरकारने शेवटच्या प्रयत्नात ४५ अब्ज रुपयांच्या नकारात्मक बॅलन्सशीटसह किमान किंमत ८५.०३ अब्ज रुपये निश्चित केली होती. त्यांना फक्त १० अब्ज रुपयांचे प्रस्ताव मिळाले. पीआयए अनेक वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
२०२३ मध्ये जेव्हा ७,००० पीआयए कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०२३ चा पगार मिळाला नाही. तेव्हापासूनच पाकिस्तान एअरलाईन्स दिवाळखोरीत आहे. यापूर्वी, युरोपियन युनियनने २०२० मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पीआयएवर बंदी घातली होती.
संरक्षण आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी पाकिस्तान आणि तुर्की सहमत
पाकिस्तान आणि तुर्की यांनी बुधवारी संरक्षण, व्यापार, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शविली. याचा उद्देश द्विपक्षीय व्यापाराचा आकार 5 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवणे आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकन फिदान आणि संरक्षण मंत्री यासर गुलेर यांच्यातील चर्चेदरम्यान हा करार झाला.