पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 21:40 IST2025-05-20T21:38:48+5:302025-05-20T21:40:11+5:30
Field Marshal Rank asim Munir: पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीरचा लष्करी संघर्षानंतर एकप्रकारे सन्मान करण्यात आला. पाकिस्तानने मुनीरला फील्ड मार्शल किताब जाहीर केला आहे. पण याचे महत्त्व काय?

पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बराच लष्करी संघर्ष बघायला मिळाला. पाकिस्तानने हवाई हल्ले केले. ते हाणून पाडत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हवाई तळांना लक्ष्य करत अद्दल घडवली. गुडघ्यावर आलेला पाकिस्तान शस्त्रसंधीचा प्रस्ताव घेऊन आला. पण, यात सगळ्यात जास्त फायदा झाला, तो पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीरचा! लष्करप्रमुख मुनीरला पाकिस्तान सरकारने फील्ड मार्शल हा लष्करी किताब जाहीर केला आहे. पण, याचे लष्करातील महत्त्व काय आहे, तो इतका महत्त्वाचा का मानला जातो?
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तान सरकारने त्यांचा लष्करप्रमुख जनरल असीम मुनीरला फील्ड मार्शल या सर्वोच्च लष्करी किताबाने गौरवले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या इतिहासात दुसऱ्यांदा असे कुठल्या लष्करी अधिकाऱ्याला हा किताब मिळाला आहे. यापूर्वी १९५९-६७ मध्ये अयूब खान यांना हा लष्करी किताब दिला गेला होता.
फील्ड मार्शल रँक काय असते?
मागील पाचपेक्षा जास्त दशकांमध्ये असे दुसऱ्यांदा घडले आहे की, कुठल्या सैन्य अधिकाऱ्याला फील्ड मार्शल म्हणून पदोन्नती दिली गेली आहे. फील्ड मार्शल ही लष्करातील सर्वोच्च रँक आहे आणि साधारणपणे जनरलच्या (चार स्टार) वरची पोस्ट असते.
फील्ड मार्शल पद पाच स्टार रँक म्हणून ओळखले जाते. ही रँक युद्धकाळात दिली जाते. युद्ध काळात लष्करी यश मिळवले म्हणून फील्ड मार्शल किताब दिला जातो.
भारतामध्ये फील्ड मार्शल हे लष्कारातील सर्वोच्च पद मानले जाते. फील्ड मार्शल असलेल्या व्यक्तीला जनरलचे पूर्ण पगार मिळतो. इतकंच नाही, तर त्या व्यक्तीला मरेपर्यंत सेवेतील अधिकारी मानले जाते.