शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

Petrol-Diesel Price India : भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत झाली घट, इम्रान खान यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 8:51 AM

इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे हाेरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने माेठा दिलासा दिला आहे.

इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे हाेरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने माेठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घाेषणा केली. दरम्यान, अमेरिकेच्या दबावानंतरही रशियाकडून कच्च तेल खरेदी करण्याच्या निर्णयाची पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रशंसा केली. भारतात स्वतंत्र परराष्ट्र धोरणामुळे हे शक्य झालं असल्याचं म्हटलं. याशिवाय त्यांनी पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (एन) नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार निशाणाही साधला. त्यांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचं कौतुकही केलं.

इम्रान खान यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलं. “क्वाडचा भाग असूनही, भारताने अमेरिकेच्या दबावापासून स्वतःला वेगळं ठेवलं आणि जनतेला दिलासा देण्यासाठी रशियाकडून इंधन खरेदी केलं. स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या मदतीनं आमचं सरकार जे साध्य करण्यासाठी काम करत होते ते भारतानं केलं,” असं इम्रान खान यांनी नमूद केलं.  “आपलं सरकार लोकांना दिलासा देण्यासाठी असंच काम करू इच्छित होती. परंतु मीर जाफर आणि मीर सादिक हे सत्ता परिवर्तनासाठी बाहेरील दबावाला बळी पडले,” असंही ते म्हणाले. "आमच्या सरकारसाठी पाकिस्तानचे हित सर्वोच्च होते, परंतु दुर्दैवाने मीर जाफर आणि मीर सादिक हे सत्ता परिवर्तनासाठी बाहेरील दबावासमोर झुकले. आता शीर नसलेल्या कोंबड्याप्रमाणे अर्थव्यवस्था घेऊन देश चालवला जात असल्याचंही इम्रान खान म्हणाले.पेट्रोल डिझेलची कपातकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कपात जाहीर केली. महागाई कमी करण्याच्या दृष्टीने प्लास्टिक व स्टीलच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात कपात करण्यात येणार आहे. तर काही स्टील उत्पादनावर निर्यात शुल्क आकारण्यात येणार आहे. सिमेंटच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी मालवाहतुकीत सुधारणा करण्यात येतील, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. 

गेल्या काही महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सर्वकालीन उच्चांकी पातळीवर आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ११० डाॅलर्स प्रति बॅरलवर पाेहाेचले आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅसच्या किमतीही देशभरात १ हजार रुपये प्रति सिलिंडरवर गेल्या आहेत. याशिवाय सरकारने सीएनजीच्या किमतीमध्येही वर्षभरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे महागाई प्रचंड वाढली असून सर्वसामान्य जनतेचं बजेट पूर्णपणे काेलमडलं हाेतं.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतPakistanपाकिस्तान