Petrol-Diesel Price India : भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत झाली घट, इम्रान खान यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 08:51 AM2022-05-22T08:51:58+5:302022-05-22T08:55:33+5:30

इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे हाेरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने माेठा दिलासा दिला आहे.

pakistan former pm imran khan praised the modi government for reducing the price of petrol and diesel know what it said twitter | Petrol-Diesel Price India : भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत झाली घट, इम्रान खान यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक

Petrol-Diesel Price India : भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत झाली घट, इम्रान खान यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक

Next

इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे हाेरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने माेठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घाेषणा केली. दरम्यान, अमेरिकेच्या दबावानंतरही रशियाकडून कच्च तेल खरेदी करण्याच्या निर्णयाची पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रशंसा केली. भारतात स्वतंत्र परराष्ट्र धोरणामुळे हे शक्य झालं असल्याचं म्हटलं. याशिवाय त्यांनी पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (एन) नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार निशाणाही साधला. त्यांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचं कौतुकही केलं.

इम्रान खान यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलं. “क्वाडचा भाग असूनही, भारताने अमेरिकेच्या दबावापासून स्वतःला वेगळं ठेवलं आणि जनतेला दिलासा देण्यासाठी रशियाकडून इंधन खरेदी केलं. स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या मदतीनं आमचं सरकार जे साध्य करण्यासाठी काम करत होते ते भारतानं केलं,” असं इम्रान खान यांनी नमूद केलं.

 
“आपलं सरकार लोकांना दिलासा देण्यासाठी असंच काम करू इच्छित होती. परंतु मीर जाफर आणि मीर सादिक हे सत्ता परिवर्तनासाठी बाहेरील दबावाला बळी पडले,” असंही ते म्हणाले. "आमच्या सरकारसाठी पाकिस्तानचे हित सर्वोच्च होते, परंतु दुर्दैवाने मीर जाफर आणि मीर सादिक हे सत्ता परिवर्तनासाठी बाहेरील दबावासमोर झुकले. आता शीर नसलेल्या कोंबड्याप्रमाणे अर्थव्यवस्था घेऊन देश चालवला जात असल्याचंही इम्रान खान म्हणाले.

पेट्रोल डिझेलची कपात
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कपात जाहीर केली. महागाई कमी करण्याच्या दृष्टीने प्लास्टिक व स्टीलच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात कपात करण्यात येणार आहे. तर काही स्टील उत्पादनावर निर्यात शुल्क आकारण्यात येणार आहे. सिमेंटच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी मालवाहतुकीत सुधारणा करण्यात येतील, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. 

गेल्या काही महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सर्वकालीन उच्चांकी पातळीवर आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ११० डाॅलर्स प्रति बॅरलवर पाेहाेचले आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅसच्या किमतीही देशभरात १ हजार रुपये प्रति सिलिंडरवर गेल्या आहेत. याशिवाय सरकारने सीएनजीच्या किमतीमध्येही वर्षभरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे महागाई प्रचंड वाढली असून सर्वसामान्य जनतेचं बजेट पूर्णपणे काेलमडलं हाेतं.

Web Title: pakistan former pm imran khan praised the modi government for reducing the price of petrol and diesel know what it said twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.