शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 22:11 IST

India Pakistan War, Missile Drone Attack Location: भारताच्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने हवेतच सर्व क्षेपणास्त्रे नष्ट केली. कोणत्याही क्षेपणास्त्रांना हल्लाची संधी मिळू दिली नाही.

India Pakistan War, Missile Drone Attack Location: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे निराश झालेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. गुरुवारी पहाटे पाकिस्तानने जम्मू आणि पठाणकोटसह अनेक संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य केले होते. त्यानंतर दिवसभरात भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली. त्यानंतर आज संध्याकाळपासून पाकिस्तानने पुन्हा हल्ला करण्यात सुरुवात केली. पाकिस्तानने एकाच वेळी आठ क्षेपणास्त्रांनी जम्मू नागरी विमानतळ, सांबा, आरएस पुरा, अर्निया आणि आसपासच्या परिसरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने हवेतच सर्व क्षेपणास्त्रे नष्ट केली. कोणत्याही क्षेपणास्त्रांना हल्लाची संधी मिळू दिली नाही.

कुपवाडामध्ये जोरदार गोळीबार

क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यान जम्मूच्या अखनूर भागात युद्धाच्या सायरनचे आवाज ऐकू आले. त्याच वेळी, काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सीमेपलीकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. निवासी भागांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. तथापि, भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण जम्मू प्रदेशात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

पठाणकोट एअरबेसवरील हल्लाही अयशस्वी

पाकिस्तानने जम्मूसह पठाणकोट एअरबेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथेही भारतीय हवाई संरक्षण दलाने त्यांचे मनसुबे उधळून लावले. पठाणकोटसारख्या संवेदनशील लष्करी तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न हेच दर्शवितो की पाकिस्तान मोठ्या प्रमाणात भारताला चिथावणी देऊ इच्छित आहे. परंतु भारतीय सैन्यदल सज्ज असल्याने पाकिस्तानचे सर्व कट वेळीच उधळून लावण्यात आले आहेत.

२४ तासांत दुसरा अयशस्वी हल्ला

ऑपरेशन सिंदूरनंतर २४ तासांत पाकिस्तानकडून दुसऱ्यांदा अयशस्वी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानच्या सैन्याची कमकुवत बाजू उघडकीस आणली. त्यांची निराशा त्यांच्या मानसिकतेतून दिसून येते आहे. आता भारतीय लष्कराने सीमेवर देखरेख वाढवली आहे आणि कोणताही नवीन हल्ला रोखण्यासाठी ते पूर्णपणे सतर्क आहेत. भारत पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान