Pakistan Economic Crisis : जगाला पाकिस्तानवर विश्वास नाही, IMF-World Bank चं ‘हे’ रेटिंग दिवाळखोरीचा पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 02:01 PM2023-04-13T14:01:09+5:302023-04-13T14:01:59+5:30

पाकिस्तान आज मोठ्या आर्थिक संकटातून (Pakistan Economic Crisis) जात आणि दुसरीकडे पाकिस्तानातील जनता उपासमारीनं त्रस्त आहे.

Pakistan Economic Crisis The world does not trust Pakistan IMF World Bank s rating is proof of bankruptcy no food price hike inflation | Pakistan Economic Crisis : जगाला पाकिस्तानवर विश्वास नाही, IMF-World Bank चं ‘हे’ रेटिंग दिवाळखोरीचा पुरावा

Pakistan Economic Crisis : जगाला पाकिस्तानवर विश्वास नाही, IMF-World Bank चं ‘हे’ रेटिंग दिवाळखोरीचा पुरावा

googlenewsNext

पाकिस्तान आज मोठ्या आर्थिक संकटातून (Pakistan Economic Crisis) जात आणि दुसरीकडे पाकिस्तानातील जनता उपासमारीनं त्रस्त आहे. ही परिस्थिती असतानाही एक-दोन देश सोडून कोणीही त्यांना मदत करण्यास तयार नाही. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या या देशाकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही पाठ फिरवली आहे. दरम्यान, आयएमएफ, जागतिक बँकेपासून ते आशियाई विकास बँकेपर्यंत देशाच्या विकासदराचा अंदाज लावला असता, पाकिस्तानवर कोणाचाच विश्वास नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ही मानांकनं देशाच्या दिवाळखोरीचाच पुरावा आहेत.

पाकिस्तानातील महागाईचा दर ३५ टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. महागाई दर नियंत्रणात येण्याची शक्यताही कमीच दिसत आहे. यापूर्वी महागाईचा दर आणखी वाढण्याचा इशाराही सरकारनं दिला होता. पिठापासून दुधापर्यंत, विजेपासून गॅसपर्यंत सर्वच गोष्टींवर देशातील जनता आता अवलंबून आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की लोक पिठाचीही लूट करत आहेत आणि या प्रकारांमध्ये अनेकांना आपा जीवही गमवावा लागत आहे. यासोबतच देशावरील प्रचंड कर्ज हे संकट आणखीनच वाढवत आहे.

मोठं कर्ज
पाकिस्ताननं आतापर्यंत अनेक देशांकडून अब्जावधी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. देशावर एकूण कर्ज आणि देणी ६० ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांपेक्षाही अधिक आहे. हे देशाच्या जीडीपीच्या ८९ टक्के आहे. या कर्जातील ३५ टक्के हिस्सा हा केवळ चीनचाच आहे. यामध्ये चीनच्या सरकारी बँकांचाही समावेश आहे. पाकिस्तानवर चीनचं कर्ज ३० अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे, फेब्रुवारी २०२२ मध्ये ते २५.१ अब्ज डॉलर्स होते. येत्या जून महिन्यात पाकिस्तानला चीनला ३ अब्ज डॉलर्स द्यायचे आहेत.

अद्यापही मदतीची अपेक्षा 
पाकिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीत त्यांना मदत करणाऱ्या देशांमध्ये चीनचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी चीनला ७० कोटी डॉलर्सचं कर्ज देण्याची घोषणा केली होती. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणाऱ्या बेल आऊट पॅकेजची वाट पाहत आहे. २०१९ मध्ये करण्यात आलेल्या ६.५ अब्ज डॉलर्सच्या बेल आऊट कराराच्या हिस्स्याच्या रुपात पाकिस्तान आयएमएफकडून १.१ अब्ज डॉलर्सचा निधी देण्याची मागणी करत आहे. परंतु याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

आर्थिक विकास दराचा अंदाज घटला
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) आर्थिक वर्ष २०२३ मध्ये पाकिस्तानच्या आर्थिक विकास दराचा अंदाज पूर्णपणे कमी केला आहे आणि तो ०.५ टक्के राहू शकतो असं म्हटलं आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये जागतिक संस्थेनं पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या विकास दराचा अंदाज ३.५ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आणला होता. यासोबतच, आयएमएफने आपल्या ताज्या ग्लोबल इकॉनॉमी आउटलुक अहवालात असंही म्हटलंय की देशातील बेरोजगारीचा दर गेल्या वर्षीच्या ६.२ टक्क्यांवरून चालू आर्थिक वर्षात ७ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

केवळ आयएमएफच नव्हे, तर जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेनंही पाकिस्तानच्या विकासदराचा अंदाज व्यक्त केला आहे. तेही आयएमएफन मांडलेल्या अंदाजाच्या जवळपास आहेत. चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानची अर्थव्यवस्था ०.४ टक्के दराने वाढेल असा जागतिक बँकेचा अंदाज आहे. याशिवाय आशियाई विकास बँकेने (ADB) देशाची अर्थव्यवस्था ०.६ टक्के दरानं वाढण्याचा अंदाज व्यक्त केलाय. दरम्यान, या पाकिस्तानला २०२४ मध्ये थोडा दिलासा मिळू शकतो असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये देशाचा आर्थिक विकास दर ३.५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलीये.

Web Title: Pakistan Economic Crisis The world does not trust Pakistan IMF World Bank s rating is proof of bankruptcy no food price hike inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.