शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
3
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
4
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
5
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
6
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
7
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
8
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
9
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
10
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
11
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
12
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
13
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
14
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
15
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
16
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
17
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
19
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
20
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक

VIDEO : "तुम्ही जेव्हा झोपता, तेव्हा कोरोनाही झोपतो", पाकिस्तानी मौलवींचं अजब तर्कट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 4:38 PM

पाकिस्तानातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1,35,700च्याही पुढे गेला आहे. यापैकी 51,518 रुग्ण सिंध प्रांत, 50,087 पंजाब प्रांतात आहेत.

ठळक मुद्देया व्हिडिओ क्लीपमध्ये एक मौलवी, कोरोना व्हायरसपासून बचावासाठी भरपूर झोपा, असा सल्ला देताना दिसत आहेत.पाकिस्तानातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1,35,700च्याही पुढे गेला आहे. जवळपास 9,000 कोरोनाबाधित रुग्णालयात भरती आहेत.

इस्लामाबाद : जगातील इतर देशांप्रमाणेच पाकिस्तानातही कोरोना थैमान घालत आहे. यातच आता येथील एका मौलवीचे एक वक्तव्य सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे लोकही मौलवींच्या या वक्तव्याची जबरदस्त खिल्ली उडवत आहेत. या व्हिडिओ क्लीपमध्ये एक मौलवी, कोरोना व्हायरसपासून बचावासाठी भरपूर झोपा, असा सल्ला देताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये मोलवी म्हणतात, "स्वतः आपले डॉक्टरच आपल्याला सांगत आहेत, की तुम्ही अधिक झोपा. जेवढ्या वेळ तुम्ही झोपाल, तेवढ्या वेळ तुमचा व्हायरसही झोपलेला असेल आणि तो तुमचे काहीच नुकसान करणार नाही. त्यामुळे झोपल्यावर तो झोपतो, तर मेल्यानंतर तो मरतोसुद्धा." 

CoronaVirus News: होऊ नयेत अमेरिकेसारखे हाल; म्हणून, कोरोनावर मात करण्यासाठी मोदी सरकारचा प्लॅन तयार

हा व्हिडिओ पत्रकार नाइला इनायत यांनी आपल्या ट्विटरवर टाकला आहे. 

96 तास, 38 बैठका अन् पाच राज्यांवर 'फोकस', कोरोनावर वार करण्यासाठी मोदी-शाहंचा टॉप गिअर

ते हे सायन्स यापूर्वी का नाही सांगू शकले, असे एका इंडियन मुलगी नावाच्या ट्विटर युझरने विचारला आहे. 

CoronaVirus News: खोटारड्या चीनचा बुरखा टराटरा फाटला; 'एकट्या वुहानमध्ये तब्बल 36 हजार लोकांवर अंत्यसंस्कार'

"सर, कोणती मेडिकल अथवा सायंटिफिक कन्सेप्ट याची व्याख्या करू शकते," असा प्रश्न डॉ. सरकार नामक एका ट्विटर युझरने केला आहे.

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

पाकिस्तानातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1,35,700च्याही पुढे गेला आहे. यापैकी 51,518 रुग्ण सिंध प्रांत, 50,087 पंजाब प्रांतात, 17,450 खैबर-पख्तुनख्वा भागात, 7,866 बलुचुस्तानात, 7,163 इस्लामाबादमध्ये, 1,044 गिलगीट बाल्टिस्तानमध्ये तर 574 पीओकेमध्ये आहेत.

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

पाकिस्तानच्या आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात कोरोनाची सुविधा असलेल्या रुग्णालयांची संख्या 820 एवढी आहे. तर जवळपास 9,000 कोरोनाबाधित रुग्णालयात भरती आहेत. तसेच इतर रुग्ण त्यांच्या घरीच सेल्फ आयसोलेशनमध्ये बरे होत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तानhospitalहॉस्पिटलMuslimमुस्लीम