शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

भारताच्या मदतीसाठी पाच देश एकवटले; चीन-पाकिस्तान तोंडावर आपटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 10:14 AM

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चीन-पाकिस्तान जोरदार धक्का

संयुक्‍त राष्‍ट्र: चीनच्या मदतीनं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला आहे. पाकिस्तान आणि चीनची नापाक खेळी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमनं उधळून लावली आहे. भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचा मुद्दा या पाच देशांनी उपस्थित केला. चीनची घुसखोरी उधळण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज, पेंगाँग सरोवर, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर क्षेपणास्त्रेही तैनातपाकिस्ताननं याआधीही चीनच्या मदतीनं भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला आहे. अंगरा अप्पाजी आणि गोबिंदा पटनायक या भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्यात यावं, यासाठी पाकिस्तानचे चीनच्या मदतीनं प्रयत्न सुरू होते. मात्र या दोघांविरोधात पुरेसे पुरावे नसल्यानं त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ नये, अशी भूमिका सुरक्षा परिषदेच्या तीन स्थायी आणि दोन अस्थायी सदस्यांनी घेतली. तसं आवाहन त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला केलं. याआधीही पाकिस्ताननं वेनुमाधव डोंगरा आणि अजय मिस्त्री या दोन भारतीयांना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. पण तो अमेरिकेनं उधळून लावला होता.भारत-चीनमध्ये तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण चर्चा, भारताने दिला ड्रॅगनला तिसरा झटकापाकिस्ताननं एकूण ४ भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान अफगाणिस्तानातील विकास कामांशी संबंधित भारतीय नागरिकांवर नजर ठेवून आहे. या नागरिकांवर बिनबुडाचे आरोप करून त्यांचा संबंध पाकिस्तानमधील दहशतवादी घटनांशी जोडण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहेत. मात्र पाकिस्तानचे चारही प्रस्ताव सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी रोखले. त्यामुळे पाकिस्तान तोंडावर पडला. मोदी सरकारचा मोठा निर्णय; पबजीसह ११८ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदीयाआधीही पाकिस्तानला अशा प्रकारे भारतीय नागरिकांविरोधात पुरेसे पुरावे देण्यात अपयश आलं होतं. आता पुन्हा एकदा पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. यानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी टी. एस. त्रिमूर्तींनी एक ट्विट करून पाकिस्तानवर निशाणा साधला. 'दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरक्षा परिषदेनं हाणून पाडला. पाकिस्तानची नापाक खेळी रोखणाऱ्या देशांचे आम्ही आभारी आहोत,' असं त्रिमूर्तींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनterroristदहशतवादीPakistanपाकिस्तान