शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पाकचा अफगाणवर बॉम्बहल्ला, ४०० ठार; दहशतवादी तळ समजून व्यसनमुक्ती केंद्र उडविले, २५० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 06:43 IST

हा हल्ला मानवताद्रोही, क्रूरतेचा कळस : भारताने केला निषेध

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी सोमवारी अफगाणिस्तानमधील अनेक ठिकाणी भयंकर बॉम्बहल्ले केले. त्यामध्ये काबुल येथील एका व्यसनमुक्ती रुग्णालय संकुलालाही लक्ष्य करण्यात आले. यात  ४०० जण ठार आणि २५० जण जखमी झाले. क्रुरतेचा कळस गाठणाऱ्या या हल्ल्याबद्दल भारतानेपाकिस्तानचा तीव्र निषेध केला. मात्र आम्ही रुग्णालयावर नव्हे तर दहशतवादी व त्यांना मदत करणारे लष्करी तळ यांना लक्ष्य केले असे पाकिस्तानने म्हटले आहे.  तालिबान्यांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन गझब लिल हक’ ही मोहीम सुरू केली आहे. त्याद्वारे सोमवारी रात्री काबुल, नंगरहार परिसरात हवाई हल्ले करण्यात आले असे पाकिस्तानने म्हटले आहे. दारुलअमान, अरजान कीमत, खैरखाना आणि काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात अनेक ठिकाणी स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू आले. तालिबान सरकारचे उपप्रवक्ते हमदुल्ला फित्रत यांनी सांगितले की, पाकिस्तानने काबुलमध्ये व्यसनमुक्ती रुग्णालयावर बॉम्ब टाकले. त्यात मोठी जीवितहानी झाली आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये २६०० किमी लांबीची सीमा आहे. तिथे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांत हल्ले, प्रतिहल्ले सुरू आहेत. 

हल्ल्यावेळी संकुलात ३ हजार लोकतालिबान सरकारचे उपप्रवक्ते हमदुल्ला फित्रत यांनी सांगितले की, रुग्णालय संकुलावर हल्ल्यानंतर आग लागली. ही आग शर्थीच्या प्रयत्नानंतर विझविण्यात आली. यात संकुलातील पाच इमारतींची मोठी हानी झाली असून, त्यांच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. त्या रुग्णालयात तीन हजार रुग्ण उपचार घेत होते. मात्र पाकिस्तानने काबुल येथे तसेच नंगरहार प्रांतात आम्ही हल्ले करून तालिबानची लष्करी ठिकाणे, दारूगोळ्याची कोठारे नष्ट केली, असा दावा केला आहे.  

अहमदियांवर क्रूर हल्ले : पाककडून अहमदिया पंथीयांवर होणारे क्रूर हल्ले तसेच अफगाणवरचे हवाई हल्ले यांचा भारताने तीव्र निषेध केला. असहाय्य अफगाण नागरिकांची हकालपट्टी करणे, त्यांच्यावर हवाई हल्ले करणे ही पाकची क्रूर कृत्ये आहेत, असे भारताने म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's Afghanistan Bombing: Hundreds Dead; Rehab Center Hit.

Web Summary : Pakistani airstrikes in Afghanistan, including Kabul rehab center, killed hundreds. Pakistan claims targeting terrorists, not civilians. India condemns attacks on vulnerable Afghans amid ongoing border tensions.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानWarयुद्धAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारतDeathमृत्यू