पाकिस्तान हादरले! मोठ्या आत्मघातकी हल्ल्यात कर्नलसह तीन सैनिक ठार, एका नागरिकाचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 17:56 IST2026-02-21T17:55:44+5:302026-02-21T17:56:08+5:30

Pakistan suicide attack Khyber Pakhtunkhwa: गेल्या १५ दिवसातील हा तिसरा आत्मघातकी हल्ला आहे

Pakistan attack 3 blasts in last 15 days in khyber pakhtunkhwa 3 soldiers killed one colonel died | पाकिस्तान हादरले! मोठ्या आत्मघातकी हल्ल्यात कर्नलसह तीन सैनिक ठार, एका नागरिकाचाही मृत्यू

पाकिस्तान हादरले! मोठ्या आत्मघातकी हल्ल्यात कर्नलसह तीन सैनिक ठार, एका नागरिकाचाही मृत्यू

Pakistan suicide attack Khyber Pakhtunkhwa: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा (KP) प्रांतातील बन्नू जिल्ह्यात एक मोठा आत्मघातकी हल्ला झाला. या हल्ल्यात तीन सुरक्षा कर्मचारी ठार झाले. मृतांमध्ये लेफ्टनंट कर्नल दर्जाचा एक अधिकारी समाविष्ट होता. यासह एका नागरिकाचाही मृत्यू झाला असून, इतर अनेक सैनिक जखमी झाले आहेत. अहवालानुसार कर्नल गुल फराजसह एकूण पाच सैनिक ठार झाले आणि चार जण जखमी झाले. गेल्या १५ दिवसांतील हा तिसरा हल्ला आहे. तर गेल्या पाच दिवसात हा दुसरा आत्मघातकी हल्ला आहे.

बन्नूच्या सरार दर्गा परिसरात हा हल्ला झाला. एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली रिक्षा सुरक्षा दलाच्या एमआरपी (माइन-रेझिस्टंट अ‍ॅम्बुश प्रोटेक्टेड) ​​वाहनावर धडकवली.  एमआरपी वाहन विशेषतः अशा हल्ल्यांनाच तोंड देण्यासाठी डिझाइन केलेले आहे, परंतु स्फोट अत्यंत शक्तिशाली होता. त्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले. हल्ल्याच्या वेळी, कमांडिंग ऑफिसर, लेफ्टनंट कर्नल शहजादा गुल, गुप्तचर यंत्रणेवर आधारित ऑपरेशनमध्ये सहभागी होते. ते वाहनातून बाहेर पडत असतानाच स्फोट झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

खोस्त प्रांतात ड्रोन दिसले

यापूर्वी, अफगाणिस्तानातील खोस्त प्रांतात ड्रोन दिसल्याचे वृत्त होते. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. आतापर्यंत पाच दहशतवादी मारले गेले आहेत आणि ही कारवाई सुरूच आहे. कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. परंतु असा संशय आहे की, त्यामागे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) संघटनेचा हात असू शकतो. TTPने यापूर्वीही या प्रदेशात सुरक्षा दलांना लक्ष्य केले आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात अलिकडच्या काळात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. या आठवड्यात, TTPने बाजौर जिल्ह्यातील एका चौकीवर स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवले, ज्यामध्ये ११ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १२ जणांचा मृत्यू झाला होता.

TTPच्या कारवायांचा जोर वाढला

गेल्या काही महिन्यांपासून टीटीपी पाकिस्तानमध्ये हल्ले वाढवत आहे. या संघटनेचे उद्दिष्ट सरकार उलथवून त्यांची कट्टर इस्लामिक विचारसरणी लादणे हा आहे. टीटीपी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर हल्ले आणि प्रशिक्षणासाठी करते असा पाकिस्तानी सरकारचा आरोप आहे. तथापि, अफगाणिस्तानने सातत्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Web Title : पाकिस्तान में आत्मघाती हमला: कर्नल सहित सैनिक, नागरिक নিহত

Web Summary : पाकिस्तान के खैबर पख्तूनख्वा में आत्मघाती हमले में लेफ्टिनेंट कर्नल, सैनिक और एक नागरिक নিহত। हमलावर ने सुरक्षा बलों के वाहन को निशाना बनाया। अफगान सीमा के पास बढ़ते आतंकवादी गतिविधियों के बीच टीटीपी पर संदेह है। खोज अभियान जारी है।

Web Title : Pakistan Rocked: Suicide Attack Kills Colonel, Soldiers, Civilian

Web Summary : A suicide attack in Pakistan's Khyber Pakhtunkhwa killed a lieutenant colonel, soldiers, and a civilian. The bomber targeted a security forces vehicle. The TTP is suspected, amidst rising terrorist activity near the Afghan border. Search operations are underway.