इराणवर प्रतिहल्ला करून पाकिस्तानी लष्करालाच फायदा झाला? एकाच दगडात दोन पक्षी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 13:37 IST2024-01-18T13:37:09+5:302024-01-18T13:37:38+5:30
इराण हल्ल्याचा फायदा पाकिस्तानलाच जास्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इराणवर प्रतिहल्ला करून पाकिस्तानी लष्करालाच फायदा झाला? एकाच दगडात दोन पक्षी...
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानवरइराणने एअरस्ट्राईक करत पाकिस्तानी सैन्याची जगभरात नाचक्की केली होती. यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी इराणमधीलदहशतवादी अड्ड्यांवर मिसाईल हल्ले करत बदला घेतला आहे. या हल्ल्यांतून पाकिस्तानी लष्कराने एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत.
इराण हल्ल्याचा फायदा पाकिस्तानलाच जास्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील दहशतवादी संघटना जैश अल अदलच्या मुख्यालयावर एअरस्ट्राईक केले होते. तर पाकिस्तानने बलुच दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले केले आहेत.
पाकिस्तानी सैन्याला यातून फायदा होणार आहे. पहिला म्हणजे पाकिस्तानी जनतेचा सैन्याबद्दल असलेला राग शांत होणार आहे.
पाकिस्तानी लोक इराणच्या हल्ल्यामुळे नाराज झाले होते. तसेच आपल्या सैन्याच्या क्षमतेवर ते प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. पाकिस्तानी लष्कराला फक्त राजकारणात इंटरेस्ट आहे, असे लोक म्हणत होते. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत. मात्र याआधी लष्कराने इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाविरोधात अनेक कारवाया केल्या आहेत. यामुळेही लोकांमध्ये राग आहे.
लष्कराने पुन्हा एकदा नवाझ शरीफ यांना पाकिस्तानात आणले आहे. नवाझ शरीफ यांच्या पंतप्रधान होण्याच्या मार्गातील सर्व काटे एक एक करून काढले जात आहेत. यापैकीच एक सर्वात मोठा काटा असलेले इम्रान खान यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. इराणवर झालेल्या हवाई हल्ल्यामुळे पुन्हा एकदा लोकांना आपल्या बाजूने करण्यात लष्कराला यश येणार आहे.