पाकिस्तानची अमेरिकेकडे धाव, ट्रम्प प्रशासनानेही उचलले तातडीचे पाऊल; भारताचा नकाशा का हटवला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:56 IST2026-02-13T12:55:07+5:302026-02-13T12:56:35+5:30

या नकाशात पाकव्याप्त काश्मीरसह जम्मू काश्मीर आणि अक्साई चीन भारताचा भूभाग दाखवण्यात आला. मात्र आता तो नकाशा हटवण्यात आला आहे.

Pakistan approach to US authorities after a trade deal post carried a map showing PoK and Aksai Chin within India border | पाकिस्तानची अमेरिकेकडे धाव, ट्रम्प प्रशासनानेही उचलले तातडीचे पाऊल; भारताचा नकाशा का हटवला?

पाकिस्तानची अमेरिकेकडे धाव, ट्रम्प प्रशासनानेही उचलले तातडीचे पाऊल; भारताचा नकाशा का हटवला?

इस्लामाबाद - भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारानंतर अमेरिकेकडून सोशल मीडियावर भारताचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तानला मिरची झोंबली आहे. या नकाशात अमेरिकेने पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन भारताचा प्रदेश दाखवला आहे. मात्र अमेरिकेने हा नकाशा जारी करताच पाकिस्तानी परराष्ट्र खात्याने अमेरिकेकडे धाव घेतली. भारताच्या नकाशावर आक्षेप घेत पाकिस्तानने अमेरिकेकडे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ट्रम्प प्रशासनानेही तातडीने पाऊल उचलले. 

पाकिस्तानने दावा केलाय की, अमेरिकेकडे आम्ही संपर्क करून आमचा आक्षेप नोंदवला त्यानंतर भारताचा नकाशा हटवण्यात आला आहे. ज्यात संपूर्ण काश्मीर भारतात दाखवण्यात आले होते. या नकाशाबाबत आम्ही अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधला. त्यानंतर आता USTR ऑफिसच्या सोशल मिडिया हँडलवरून हा नकाशा हटवण्यात आला आहे. अमेरिकेच्या यूनाइटेड स्टेट्‍स ट्रेड रिप्रेजेंटेटिव्ह ऑफिसने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भारताचा नकाशा पोस्ट केला होता. या नकाशात पाकव्याप्त काश्मीरसह जम्मू काश्मीर आणि अक्साई चीन भारताचा भूभाग दाखवण्यात आला. मात्र आता तो नकाशा हटवण्यात आला आहे.

तर भारताचा नकाशा पोस्ट केल्यानंतर आम्ही अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना हा नकाशा बेकायदेशीर असल्याचे त्यांना माहिती पडले. अमेरिकेकडून आमच्या भूभागाचा कायदेशीर, संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केलेला नकाशा अधोरेखित करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा केल्या आहेत. ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीर हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार जनमत चाचणीद्वारे सोडवला जाणारा वादग्रस्त विषय म्हणून स्पष्ट केला आहे असं पाकिस्तानी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते ताहीर अंद्राबी यांनी म्हटलं.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या वेबसाइटवर जम्मू आणि काश्मीरचा आंतरराष्ट्रीय नकाशा आहे, जो पाकिस्तानी आणि भारतीय प्रदेशांना वेगळे करतो. पाकिस्तानने इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावास आणि वॉशिंग्टनमधील परराष्ट्र विभागातील अधिकाऱ्यांसमोर नकाशाचा निषेध केला होता. जम्मू आणि काश्मीर हा एक वादग्रस्त प्रदेश आहे असा आग्रह पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी धरला होता असं पाकमधील वृत्तपत्र डॉनमध्ये प्रसिद्ध झाले आहे. 

भारताची भूमिका काय?

जम्मू काश्मीर हा भारताचाच भाग आहे. आम्हाला आमच्या भूभागासाठी कोणत्याही बाह्य प्रमाणपत्राची गरज नाही असं भारताने अनेक वेळा सांगितले आहे. परंतु अधिकृत अमेरिकन हँडलवरून असा नकाशा शेअर करणे हे धोरणात्मक महत्त्वाचे आहे. मात्र आता ही पोस्ट हटवल्याने अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अमेरिकेने नकाशावर कोणतीही अधिकृत टिप्पणी जारी केलेली नाही.

Web Title : कश्मीर को लेकर पाकिस्तान ने अमेरिका से जताई आपत्ति, नक्शा हटाया गया

Web Summary : कश्मीर को भारतीय क्षेत्र दिखाने वाले अमेरिकी नक्शे पर पाकिस्तान ने आपत्ति जताई। पाकिस्तान की शिकायत के बाद अमेरिका ने नक्शा हटाया, दावा किया कि यह संयुक्त राष्ट्र के प्रस्तावों के अनुसार विवादित क्षेत्र को उजागर करता है। भारत का कहना है कि कश्मीर अभिन्न अंग है; अमेरिका की चुप्पी सवाल उठाती है।

Web Title : Pakistan's objection leads US to remove Indian map; Why?

Web Summary : Pakistan objected to the US displaying a map showing Kashmir as Indian territory. The US removed the map after Pakistan's complaint, claiming it highlighted disputed territory needing UN resolution. India maintains Kashmir is integral; US silence raises questions.