पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू बनला लेफ्टनंट कर्नल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 16:30 IST2022-02-25T16:30:19+5:302022-02-25T16:30:52+5:30
Pakistan appoints first Hindu lieutenant colonel : पाकिस्तानी लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदू अधिकाऱ्याला लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू बनला लेफ्टनंट कर्नल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल...
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच हिंदू धर्माच्या व्यक्तीची लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदू अधिकाऱ्याला लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगने ही माहिती दिली आहे. लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंध प्रांतातील थार जिल्ह्यातील रहिवासी असलेले कैलाश कुमार हे एक शानदार अधिकारी आहेत.
या पदावर पोहोचणारे कैलाश कुमार हे पहिले हिंदू-पाकिस्तानी असल्याचे वृत्त पाकिस्तानच्या समा न्यूजने दिले आहे. त्यांची रँक मेजरवरून लेफ्टनंट कर्नलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
पाकिस्तान मिलिटरी अकादमीमधून उत्तीर्ण
कैलाश कुमार पाकिस्तान मिलिटरी अकादमीमधून उत्तीर्ण झाल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. तसेच, ते पाकिस्तानी लष्कराच्या मेडिकल कॉर्प्समध्ये कार्यरत होते.