चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 00:39 IST2025-07-04T00:38:35+5:302025-07-04T00:39:20+5:30

पाकिस्तानी हवाई दल (PAF) प्रमुख जहीर अहमद बाबर सिद्धू संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने अमेरिका दौऱ्यावर पोहोचले आहेत. महत्वाचे म्हणजे, साधारणपणे एका दशकनानंतर, एखाद्या पाकिस्तानी हवाई दल प्रमुखाचा हा अमेरिका दौरा आहे.

pakistan air force chief zaheer ahmad babar us visit After the Chinese weapons failure Pakistan bag at Americas door; Pakistan eye on US stealth weapons | चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!

चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!

ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांनी, जगभरात चीनी क्षेपणास्त्रांची पार पोलखोल केली. पाकिस्तानने वापरलेली चिनी क्षेपणास्त्रे भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने आकाशातल्या आकाशातच उडवून लावली. यानंतर, भारतीय ताकदीसमोर चिनी शस्त्रास्त्रे म्हणजे फुसका फटका असल्याचे पाकिस्तानच्याही लक्षात आले आहे. यामुळेच आता तो काही घातक शस्त्रांस्रांसाठी अमेरिकेसमोर झोळी पसरताना दिसत आहे.

पाकिस्तानी हवाई दल (PAF) प्रमुख जहीर अहमद बाबर सिद्धू संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने अमेरिका दौऱ्यावर पोहोचले आहेत. महत्वाचे म्हणजे, साधारणपणे एका दशकनानंतर, एखाद्या पाकिस्तानी हवाई दल प्रमुखाचा हा अमेरिका दौरा आहे. यापूर्वी, फील्ड मार्शन आसिम मुनीर यांनीही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांयासोबत 'लन्च मिटिंग' केली होती.

अमेरिकेच्या लढाऊ विमानांसह या शस्त्रास्त्रांवर पाकिस्तानचा डोळा -
पाकिस्तानी हवाई दल प्रमुखांनी अमेरिकन हवाई दल प्रमुख जनरल डेव्हिड एल्विन यांच्यासह तेथील काही उच्चाधिकारी आणि नेत्यांची भेट घेतली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, चिनी शस्त्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर, पाकिस्तान आपल्या हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी एफ-१६ ब्लॉक ७० लढाऊ विमाने आणि हवाई संरक्षण प्रणालींसह अनेक प्रगत अमेरिकन शस्त्रे खरेदी करण्याचा विचार करत आहे.

ही क्षेपणास्त्रे मिळविण्याचा प्रयत्न -
पाकिस्तान AIM-7 स्पॅरो हवेतून हवेत मार करणारी क्षेपणास्त्रे, अमेरिका निर्मित हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टिमच्या (HIMARS) बॅटरीज मिळविण्याच्याही प्रयत्नात आहे. तत्पूर्वी, चीनने पाकिस्तानला पुरवलेली संरक्षण यंत्रणा भारताने भेदून पाकची लष्करी ठिकाणं नष्ट केली आणि चिनची HQ-9P आणि HQ-16 क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणाही उद्ध्वस्त केली.


 

Web Title: pakistan air force chief zaheer ahmad babar us visit After the Chinese weapons failure Pakistan bag at Americas door; Pakistan eye on US stealth weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.