युद्ध पेटलं! पाकिस्तानी सैन्याकडून अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक; काबुलसह अनेक शहरांवर हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 07:43 IST2026-02-27T07:39:43+5:302026-02-27T07:43:03+5:30

पाकिस्तानने काबूल, कंधार आणि पक्तिया येथील भागात हल्ले केल्याचा आरोप तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी  केला.

Pakistan Afghanistan War: Pakistani army launches air strikes in Afghanistan; Attacks on many cities including Kabul | युद्ध पेटलं! पाकिस्तानी सैन्याकडून अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक; काबुलसह अनेक शहरांवर हल्ले

युद्ध पेटलं! पाकिस्तानी सैन्याकडून अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक; काबुलसह अनेक शहरांवर हल्ले

काबुल - पाकिस्ताननेअफगाणिस्तानच्या अनेक शहरांमध्ये एअरस्ट्राईक केले आहे. काबुलमध्येही मोठे स्फोट झाले आहेत. या घटनेनंतर पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्रालयाने अफगाणिस्तानवर हल्ला केल्याची पुष्टी केली आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारच्या सैन्य तळांवर बॉम्बस्फोट केल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे. 

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तान शांतता आणि प्रदेशाच्या एकतेशी तडजोड करणार नाही. आमचे सैन्य पूर्णपणे आणि जोरदारपणे प्रत्युत्तर देईल. जे लोक आमच्या शांततेला कमकुवतपणा समजतात त्यांना सडेतोड उत्तर देऊ, कुणालाही सोडणार नाही असं त्यांनी स्पष्ट इशारा दिला. तर अफगाणिस्तानवरील हल्ल्याची पुष्टी तालिबानी प्रवक्त्यांनीही दिली आहे. पाकिस्तानने काबूल, कंधार आणि पक्तिया येथील भागात हल्ले केल्याचा आरोप तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी  केला.

हवाई हल्ले कुठे झाले?

पाकिस्तानी सैन्याकडून एअर स्ट्राईक करत अफगाणिस्तानच्या शहरांना टार्गेट करण्यात आले. त्यात काबूल, कंधार आणि पक्तिया येथील प्रमुख अफगाण तालिबानी लष्करी तळांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये काबूलमधील दोन ब्रिगेड मुख्यालये उद्ध्वस्त झाली तर कंधारमधील एक कॉर्प्स मुख्यालय आणि एक ब्रिगेड मुख्यालय उद्ध्वस्त झाले. कंधारमधील एक दारूगोळा डेपो आणि लॉजिस्टिक्स तळ देखील उद्ध्वस्त झाला. पक्तियामधील एक कॉर्प्स मुख्यालयही उडवण्यात आले आहे अशी माहिती पाकिस्तानच्य सरकारी वृत्त संस्थांनी दिली आहे.

दरम्यान, तालिबानने पाकिस्तानी सैन्याच्या या कारवाईला घाबरट म्हटलं आहे. डरपोक पाकिस्तानी सैन्याने काबुल, कंधार आणि पक्तियामधील काही भागांवर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही असं जबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले. शुक्रवारी पहाटे अफगाणिस्तानच्या राजधानीत ३ स्फोट आणि लढाऊ विमानांचा आवाज ऐकायला मिळाला. 

'आम्ही हल्ल्याला हिंमतीने उत्तर देऊ...'

पाकिस्तानी विमानांनी पुन्हा एकदा काबूल, कंधार आणि पक्तियावर बॉम्बस्फोट केले. अफगाणिस्तान कुठल्याही परिस्थितीत एकतेसह आमच्या देशाचे रक्षण करेल  आणि या हल्ल्याला धैर्याने उत्तर देऊ. पाकिस्तान हिंसाचार आणि बॉम्बस्फोटापासून स्वतःला मुक्त करू शकत नाही. ही ती समस्या आहे जी त्यांनी स्वत: निर्माण केली आहे. त्यांना आपलं धोरण बदलले पाहिजे आणि अफगाणिस्तानशी चांगल्या संबंधांचा मार्ग निवडला पाहिजे असं अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे.

अफगाणिस्तानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची आक्रमक भूमिका

गेल्या रविवारी अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानवर प्रत्युत्तर म्हणून सीमापार हल्ले सुरू केले होते. अफगाणिस्तानने उत्तर दिल्यानंतर पुन्हा काही तासांतच पाकिस्तानने हवाई हल्ले केले. अफगाणिस्तानने प्रत्युत्तरात केलेल्या हल्ल्यात ५५ पाकिस्तानी सैनिक मारले गेले आणि १९ पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेण्यात आल्या असं सांगण्यात आले होते. 

Web Title : पाकिस्तान ने अफगानिस्तान में हवाई हमले किए; काबुल समेत कई शहर प्रभावित

Web Summary : पाकिस्तान ने अफगानिस्तान में हवाई हमलों की पुष्टि की, जिसमें काबुल, कंधार और पक्तिया में तालिबान ठिकानों को निशाना बनाया गया। तालिबान अधिकारियों ने हमलों की सूचना दी। जवाबी कार्रवाई सीमा पार हमलों के बाद हुई, जिससे दोनों देशों के बीच तनाव बढ़ गया, अफगानिस्तान ने अपनी रक्षा करने की कसम खाई।

Web Title : Pakistan Launches Airstrikes in Afghanistan; Kabul and Other Cities Hit

Web Summary : Pakistan confirmed airstrikes in Afghanistan, targeting Taliban bases in Kabul, Kandahar, and Paktia. Taliban officials reported the attacks. Retaliation follows cross-border attacks, escalating tensions between the two nations, with Afghanistan vowing to defend itself.