आता चर्चा नाही, बदला घेणार; पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर तालिबानची मोठी घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:22 IST2026-03-17T13:21:27+5:302026-03-17T13:22:56+5:30

Pakistan-Afghanistan: पाकिस्तानने अफगाणिस्तानातील रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात 400+ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Pakistan-Afghanistan: No more talks, will take revenge; Taliban's big announcement after Pakistan's airstrike | आता चर्चा नाही, बदला घेणार; पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर तालिबानची मोठी घोषणा...

आता चर्चा नाही, बदला घेणार; पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर तालिबानची मोठी घोषणा...

Pakistan-Afghanistan: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहेत. पाकिस्तानने काबूलमधील एका रुग्णालयावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली आहे. या हल्ल्यामुळे तालिबान सरकार प्रचंड नाराज असून, तणाव कमी होण्याऐवजी अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.

काबूलमध्ये भीषण हल्ला, शेकडो मृत्यू

सोमवारी मध्यरात्री पाकिस्तानने काबूलमधील ‘ओमिद’ रुग्णालयावर बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे 250 जण गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्याच्या वेळी या केंद्रात सुमारे 2000 लोक उपस्थित होते. अनेक जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चर्चा नाही, बदला घेणार; तालिबानचा इशारा

या हल्ल्यानंतर तालिबानने तीव्र प्रतिक्रिया देत पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आता चर्चेची वेळ संपली, आम्ही आता पाकिस्तानकडून बदला घेऊ. त्यांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एका महिन्यात संघर्ष तीव्र

21 फेब्रुवारीला झालेल्या एका हल्ल्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष सुरू झाला. त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर वारंवार हल्ले केले. या संघर्षात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो नागरिक बेघर झाली आहेत.

भारताचा कडक शब्दांत निषेध

काबूलमधील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) या हल्ल्याला क्रूर, भ्याड आणि अमानवीय म्हटले. भारताने स्पष्ट केले की, पाकिस्तान या हल्ल्याला लष्करी कारवाईचे स्वरूप देऊन मोठ्या नरसंहाराचे समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हे रुग्णालय एक नागरी सुविधा केंद्र होते, कोणत्याही परिस्थितीत ते लष्करी टार्गेट मानले जाऊ शकत नाही. 

Web Title : काबुल अस्पताल पर हमले के बाद तालिबान का बदला लेने का ऐलान, तनाव बढ़ा

Web Summary : काबुल के एक अस्पताल पर घातक हवाई हमले के बाद, तालिबान ने पाकिस्तान से बदला लेने की कसम खाई है, जिससे तनाव बढ़ गया है। हमले में सैकड़ों लोग मारे गए, जिसके बाद भारत ने कड़ी निंदा की।

Web Title : Taliban vows revenge after Pakistan's Kabul hospital airstrike; tensions escalate.

Web Summary : Following a deadly airstrike on a Kabul hospital, the Taliban has vowed retaliation against Pakistan, escalating tensions. Hundreds died in the attack, prompting strong condemnation from India.