भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 20:07 IST2025-10-15T19:58:24+5:302025-10-15T20:07:50+5:30
Pakistan-Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबानकडून चालवल्या जाणाऱ्या प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून पुढील ४८ तासांसाठी तात्पुरता युद्धविराम घोषित करण्यास सहमती दर्शवली आहे. सीमेवर नव्याने झालेल्या संघर्षानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. पाकिस्ताननेअफगाणिस्तानमधील काबूलजवळील काही ठिकाणांना लक्ष्य करून केलेल्या एअर स्ट्राईकनंतर हा संघर्ष चिघलला होता. दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबानकडून चालवल्या जाणाऱ्या प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून पुढील ४८ तासांसाठी तात्पुरता युद्धविराम घोषित करण्यास सहमती दर्शवली आहे. सीमेवर नव्याने झालेल्या संघर्षानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने घोषित करण्यात आलेल्या या युद्धविरामाचा उद्देश सीमेवर उफाळलेल्या संघर्षानंतर निर्माण झालेली कटुता कमी करणे आणि चर्चेचा मार्ग खुला करणे हा आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश या गुंतागुंतीच्या पण तोडगा काढण्यासारख्या मुद्द्यांवर मार्ग शोधण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील. संघर्षाला विराम देण्याचा हेतू राजकीय चर्चेला प्रोत्साहन देणं आणि भविष्यात जीवित आणि वित्ताची हानी रोखणे हा आहे, असे याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.