शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत मोदींचं 'जय श्रीराम' अन् पाकिस्ताननं आळवला वेगळाच राग; इम्रान खान म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 19:04 IST

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा तीळपापड

इस्लामाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन केलं. त्यामुळे आता भव्य दिव्य राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी याच दिवशी मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवलं होतं. त्यामुळे पाकिस्तानला जोरदार धक्का बसला. या घटनेच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला पाकिस्ताननं नवा नकाशा प्रसिद्ध करत काश्मीरमधील वादग्रस्त भागावर दावा सांगितला. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कलम ३७० वर पुन्हा भाष्य केलं आहे. भारतानं गेल्या वर्षी उचलेलं पाऊल एक मोठी चूक होती आणि आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फसले आहेत, असं खान यांनी म्हटलं आहे. 'काश्मीरला भारतापासून लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळेल. पंतप्रधान मोदींनी गेल्या ५ ऑगस्टला एक मोठी चूक केली. मोदींना आधी कलम ३७० हटवण्याची भीती वाटत होती. मात्र निवडणूक समोर असल्यानं हिंदूना खूष करण्यासाठी त्यांनी इतका मोठा चुकीचा निर्णय घेतला,' असं खान म्हणाले आहेत. काश्मीरमध्ये संघाच्या ठगांना दहशतवादासाठी सोडू आणि मग काश्मीर हार मानेल, असं पंतप्रधान मोदींना वाटलं होतं, असा आरोप खान यांनी केला. 'पाकिस्तान मैत्री करू पाहतोय, म्हणून तो गप्प बसले, असं मोदींना वाटलं. आमचं सरकार येण्याआधी काश्मीरमध्ये पॅलेट गन्सचा वापर केला जात होता, त्यावेळी कोणीच तिथल्या नागरिकांशी संवाद साधत नव्हतं. पाकिस्तानही नाही आणि संयुक्त राष्ट्रदेखील नाही. त्यामुळेच मोदींनी अहंकाराच्या भावनेतून ५ ऑगस्टला कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण जग आपल्या बाजूनं उभं राहील, असं मोदींना वाटलं. कारण पाश्चिमात्य देशांना चीनविरोधात भारताचा वापर करून घ्यायचा आहे,' असं खान म्हणाले. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान