जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:06 IST2025-12-27T09:44:04+5:302025-12-27T10:06:21+5:30
जपानमध्ये खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे कान-एत्सु एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर झाली. या अपघातामध्ये ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर २६ जण जखमी झाले.

जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
जपानमधील खराब हवामान अनेक लोकांसाठी जीवघेणे ठरले. जपानमधील महामार्गावर वाहनांची टक्कर झाल्यानंतर भीषण आग लागली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आणि सुमारे २६ जण जखमी झाले.
वर्षाच्या अखेरीस जपानमध्ये सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अनेक लोक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडले, यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. बर्फवृष्टीमुळे, वाहने अचानक महामार्गावरून घसरून एकमेकांवर आदळली.
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
एक मृत्यू आणि २६ जण जखमी
जपानची राजधानी टोकियोपासून सुमारे १६० किलोमीटर अंतरावर असलेल्या गुन्मा प्रीफेक्चरमधील कान-एत्सु एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. जपानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि २६ जण जखमी झाले. पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.
या अपघातात अनेक ट्रकची एकमेकांना धडक झाली. यामुळे एक्सप्रेस वे बंद पडला. मागून वेगाने येणाऱ्या गाड्याही एकामागून एक आदळल्या. या घटनेत ५० हून अधिक वाहने एकमेकांवर आदळली आणि भीषण आग लागली.
घटनेच्या सात तासांनंतरही, जपानी पोलिसांनी सांगितले की आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शुक्रवारी रात्री उशिरा बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. वर्षाच्या अखेरीस आनंद साजरा करण्यासाठी अनेक लोक घराबाहेर पडले.
एक्सप्रेसवेचे काही भाग अजूनही बंद आहेत. पोलिस घटनेची चौकशी करत आहेत. रस्त्यावरून वाहने हटवली जात आहेत.
— りく (@Lc2BESpn5JG0MTk) December 26, 2025