संतापजनक! बलात्कारानंतर चिमुरडीची हत्या; हत्येनंतर मृतदेह डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 09:49 IST2023-07-31T09:47:36+5:302023-07-31T09:49:24+5:30

ही घटना शुक्रवारी सायंकाळची आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने या घटनेबाबत डाव्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आमदार अनवर सदाथ यांनी म्हटले की,  सरकार आणि पोलिसांनी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

Outrageous Girl killed after rape; After the murder | संतापजनक! बलात्कारानंतर चिमुरडीची हत्या; हत्येनंतर मृतदेह डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला

संतापजनक! बलात्कारानंतर चिमुरडीची हत्या; हत्येनंतर मृतदेह डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला

एर्नाकुलम : केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात एका ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपीने मुलीचा मृतदेह गोणीत भरून डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तो बिहारचा रहिवासी असून एर्नाकुलम येथे मजूर म्हणून काम करतो.

ही घटना शुक्रवारी सायंकाळची आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने या घटनेबाबत डाव्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आमदार अनवर सदाथ यांनी म्हटले की, 
सरकार आणि पोलिसांनी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

मुलीचा मृतदेह रविवारी तिच्या शाळेत ठेवण्यात आला होता. शेकडो लोकांनी तेथे जाऊन मुलीला श्रद्धांजली वाहिली. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी लोकांनी मागणी केली. रविवारी सकाळी ११ वाजता मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गर्दीत उभे असलेले अनेक लोक रडत होते.

तुम्हाला जमतेय की...
मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी तिच्या वर्गमित्रांचे आई-वडीलही आले होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात या घटनेबाबत लोकांच्या मनात संताप दिसून येत होता. आरोपीला तुरुंगात डांबून खाऊ घालणे हा न्याय होणार नाही. आरोपीला कठोर शिक्षा द्यायला हवी. सरकार काही करू शकत नसेल तर त्याला जनतेच्या हाती द्या, अशी मागणी नागरिकांनी केली. 
 

Web Title: Outrageous Girl killed after rape; After the murder