शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:46 IST

Donald trump India Pakistan Conflict 2025: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मी रोखल्याचा दावा केला आहे. 

India Pakistan Conflict Donald trump: पाकिस्तानसोबत झालेल्या शस्त्रसंधी चर्चेत अमेरिकेची कोणतीही भूमिका नव्हती, सहभाग नव्हता असे भारताने स्पष्ट केले; पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने हा संघर्ष थांबवल्याचे श्रेय घेत आहेत. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मी दोन्ही देशातील लष्करी संघर्ष थांबवल्याचा दावा केला. इतकंच नाही तर दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्र युद्ध झाले असते, असा स्फोटक दावाही केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये मोठा लष्करी संघर्ष झाला. भारताने पाकिस्तानच्या काही हवाई दलाच्या तळांनाही लक्ष्य केले. हा संघर्ष वाढण्याची चिन्हे असतानाच अचानक राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली होती. हा संघर्ष थांबवण्याचे श्रेय सातत्याने ट्रम्प घेत असून, पुन्हा एकदा त्यांनी तसाच दावा  केला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नाटोचे महासचिव मार्क रट यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत ट्रम्प म्हणाले, 'भारत आणि पाकिस्तान हे ज्या पद्धतीने पुढे पुढे चालले होते ते तसेच सुरू राहिले असते, तर आणखी एका आठवड्यामध्ये त्यांच्यामध्ये अण्वस्त्र युद्धाचा भडका उडाला असता.'

ट्रम्प म्हणाले, 'मी त्यांना (भारत आणि पाकिस्तान) म्हणालो की, जोपर्यंत तुम्ही हा मुद्दा सोडवत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्याशी व्यापाराबद्दल चर्चा करणार नाही. त्यामुळे त्यांनी संघर्ष थांबवला.'

डोनाल्ड ट्रम्प भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबल्यापासून हा दावा करत आहे की, व्यापार बंद करण्याची धमकी देऊन ही शस्त्रसंधी घडवून आणली. दुसरीकडे भारत वारंवार हा दावा फेटाळत आला आहे.

संघर्ष सुरू असतानाच ट्रम्प यांनी केली होती शस्त्रसंधीची घोषणा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष वाढलेला असतानाच १० मे रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली होती. अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशात शस्त्रसंधी झाल्याचे त्यांनी म्हटले होते. 

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक