ऑपरेशन सिंदूर: भारताच्या तडाख्यात झाली उद्ध्वस्त, ती ठिकाणे पाकिस्तानने झाकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:55 IST2025-06-11T16:52:52+5:302025-06-11T16:55:30+5:30

Operation Sindoor: सीमेपलिकडून उचापत्या करणाऱ्या पाकिस्तानला भारताने त्याच्याच भाषेत उत्तर दिले. भारतीय लष्कराने पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांवरच हल्ले करत जबर घाव घातला. 

Operation Sindoor: India's attack destroyed the areas, Pakistan covered them | ऑपरेशन सिंदूर: भारताच्या तडाख्यात झाली उद्ध्वस्त, ती ठिकाणे पाकिस्तानने झाकली

ऑपरेशन सिंदूर: भारताच्या तडाख्यात झाली उद्ध्वस्त, ती ठिकाणे पाकिस्तानने झाकली

Operation Sindoor India: दहशतवादाला खतपाणी घालून भारतात अशांततेचे प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला भारताने मे महिन्यात चांगलाच धडा शिकवला. भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने थेट भारतातील नागरी वस्त्यांवरच हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय लष्कराने पाकिस्तानातील हवाई तळांनाच लक्ष्य केले. भारताच्या हल्ल्यात झालेले नुकसान पाकिस्तानकडून आता झाकले जात आहे. तसे काही सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारताच्या हल्ल्यात जे ठिकाणांचे नुकसान झाले आहे, ते झाकण्याचे काम पाकिस्तानकडून करण्यात आले आहे. मॅक्सर टेक्नॉलॉजीने काही फोटो टिपले आहेत. अवकाशातून घेण्यात आलेल्या या फोटोत हल्ल्यामुळे नुकसान झालेले नुकसान. आणि आता पाकिस्तानने कशाप्रकारे ते झाकले आहे, हे दिसत आहे. 

पाकिस्तानने तीन ठिकाणे झाकली

भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकिस्तानातील तीन ठिकाणी जबर हल्ले केले होते. मुरीद, जकोबाबाद आ भोलारी या तीन लष्करी ठिकाणी भारतीय लष्काराच्या हल्ल्यात प्रचंड नुकसान झाले. 

वाचा >>ऑपरेशन सिंदूरदरम्यान कुणाचं झालं सर्वाधिक नुकसान? अमेरिकन रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

सिंध प्रांतात असलेल्या भोलारी हवाई तळाचे ४ जून रोजी काही फोटो सॅटेलाईटच्या मदतीने टिपण्यात आले. मॅक्सर टेक्नॉलॉजीने टिपलेल्या या फोटोमध्ये ज्या ठिकाणी छताची पडझड झाली आहे, तिथे हिरव्या रंगाची तातपत्री अंथरल्याचे दिसत आहे. 

पंजाब प्रांतातील मुरीदमधील तळावर असेच दृश्य दिसले आहे. २ जून रोजी हिरव्या रंगाच्या तातडपत्रीने हे पडलेले छत आणि नुकसान झालेली जागा झाकण्यात आली आहे. भारताने १० मे रोजी येथील कमांड कंट्रोल सिस्टीम उद्ध्वस्त केली होती. या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असावी. त्याबद्दल काही कळू नये म्हणून झाकले असावे, असेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

Web Title: Operation Sindoor: India's attack destroyed the areas, Pakistan covered them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.