Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:35 IST2025-05-08T15:23:09+5:302025-05-08T15:35:18+5:30
Operation Sindoor: भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम आणि संरक्षण क्षेपणास्त्र प्रक्षेपकांचं मोठं नुकसान झालं आहे. पा

Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
Operation Sindoor: भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम आणि संरक्षण क्षेपणास्त्र प्रक्षेपकांचं मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानला चीनकडून HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम मिळाली आहे.
HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम काय आहे?
एचक्यू-९ एअर डिफेन्स सिस्टीमबद्दल बोलायचं झालं तर ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. चायना प्रिसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशनने (सीपीएमआयईसी) ही प्रणाली विकसित केलीये. पाकिस्ताननं २०२१ मध्ये ही यंत्रणा आपल्या लष्करात समाविष्ट केली होती. राफेल, सुखोई आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसारख्या भारताच्या हवाई धोक्याला तोंड देण्यासाठी पाकिस्ताननं चिनी वस्तूंवर अवलंबून राहण्याचा निर्णय घेतला. परंतु आता त्याचं पितळ उघडं पडलं आहे. याची रेंज १२५ ते २०० किलोमीटरपर्यंत असल्याचं सांगितलं जातं. यात एकाच वेळी १०० टार्गेट्स ट्रॅक करण्याची क्षमता आहे.
भारतीय लष्कराचा आणखी एक 'धमाका'; पाकिस्तानची HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली केली उद्ध्वस्त
काय आहे एचक्यू-९ चं सत्य?
पाकिस्तानी चीनच्या एचक्यू ९ ची तुलना भारताच्या एस-४०० एअर डिफेन्स सिस्टिमशी करतात. पाकिस्तानी काहीही म्हणत असलं तरी सत्य हे आहे की तांत्रिकदृष्ट्या हे एचक्यू-९ एस-४०० समोर कुठेही उभे राहत नाही. एचक्यू-९ ची रडार यंत्रणा भारताच्या ब्रह्मोससारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांना रोखण्यास सक्षम असण्याची शक्यता नाही. एस-४०० ची मारक क्षमता ४०० किमी असून ती अतिशय कमी वेळात कार्यान्वित होऊ शकते. त्या तुलनेत एचक्यू-९ तैनात करण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो.