शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 19:06 IST

इराणने युद्धग्रस्त शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या तातडीच्या सुटकेसाठी आपले हवाई क्षेत्र विशेषतः भारतासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.

इराणने युद्धग्रस्त शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या तातडीच्या सुटकेसाठी आपले हवाई क्षेत्र विशेषतः भारतासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने उचललेले हे मोठे आणि धाडसी पाऊल भारतीय मुत्सद्देगिरीचा विजय मानला जात आहे. 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत, आज (शुक्रवार) किमान १,००० भारतीय विद्यार्थी दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे.

इराणने हवाई मार्ग खुला केल्यानंतर पहिली विमानाची खेप आज रात्री ११ वाजता नवी दिल्लीत उतरणार आहे. हे विद्यार्थी इराणच्या मशहद शहरातून इराणी विमानाने दिल्लीला येतील. दुसरी आणि तिसरी उड्डाणे शनिवारी नियोजित आहेत. यापैकी एक विमान सकाळी, तर दुसरे संध्याकाळी पोहोचेल. दरम्यान, इराणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, ज्या भारतीय नागरिकांना इराण सोडून जायचे आहे, त्यांच्यासाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.

विशेष कॉरिडॉरची व्यवस्था!गेल्या आठ दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या काळात दोन्ही देश एकमेकांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहेत. क्षेपणास्त्र हल्ल्यांदरम्यान इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे आणि बहुतेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे थांबवली आहेत. असे असूनही, भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी एक विशेष कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात आली आहे. भारताने बुधवारी इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले होते.

काही भारतीय विद्यार्थी जखमीदिल्लीतील इराणी दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही भारतीय विद्यार्थी इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. ते सर्व तेहरानमधील इराणी परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत. यापूर्वी, एकूण ११० भारतीय विद्यार्थ्यांचा पहिला गट बुधवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत पोहोचला होता. यापैकी ९४ विद्यार्थी जम्मू-काश्मीरचे होते. हे सर्व विद्यार्थी उर्मिया मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते आणि त्यांना आर्मेनिया आणि दोहामार्गे बाहेर काढण्यात आले.

इराण आणि आर्मेनिया सरकारचे आभारइराणमधील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारत सरकार गेल्या अनेक दिवसांपासून इराणमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात उत्तर इराणमधून ११० भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे. भारत सरकारने या सुटकेच्या प्रक्रियेला सहकार्य केल्याबद्दल इराण आणि आर्मेनियाच्या सरकारांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलIndiaभारतwarयुद्ध