ऑपरेशन हेरॉफ: पाकिस्तानच्या २०० सैनिकांना मारले, १७ जणांना बंदी बनवले, BLAचा मोठा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 09:57 IST2026-02-02T09:56:54+5:302026-02-02T09:57:18+5:30

Operation Herof: पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये सुरू असलेल्या संघर्षात पाकिस्तानी सैन्यदल, पोलीस आणि फ्रंटियर कोअरच्या २०० हून अधिक सैनिकांना मारल्याच्या आणि १७ जणांना ताब्यात घेतल्याचा दावा बीएलएने केला आहे.

Operation Herof: 200 Pakistani soldiers killed, 17 taken prisoner, BLA makes big claim | ऑपरेशन हेरॉफ: पाकिस्तानच्या २०० सैनिकांना मारले, १७ जणांना बंदी बनवले, BLAचा मोठा दावा  

ऑपरेशन हेरॉफ: पाकिस्तानच्या २०० सैनिकांना मारले, १७ जणांना बंदी बनवले, BLAचा मोठा दावा  

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये पाकिस्तानी सैन्यदल आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) यांच्यात तुंबळ संघर्ष सुरू आहे. बीएलएने ऑपरेशन हेरॉफच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान १२ शहरांमध्ये एकाच वेळी हल्ले केले आहेत. दरम्यान, गेल्या ४० तासांपासून सुरू असलेल्या या लढाईमध्ये पाकिस्तानी सैन्यदल, पोलीस आणि फ्रंटियर कोअरच्या २०० हून अधिक सैनिकांना मारल्याच्या आणि १७ जणांना ताब्यात घेतल्याचा दावा बीएलएने केला आहे. तसेच खारन, मस्तुंग, दलबंदीन, तुमप आणि पसनी येथील टार्गेट पूर्ण करून आमचे सैनिक माघारी परतले आहेत, असा दावा बीएलएने केला आहे.

काही भागांमध्ये मात्र संघर्ष अद्याप सुरू आहे. या संघर्षात बीएलएचे १८ सैनिक मारले गेले आहेत. त्यामध्ये मजिद ब्रिगेडच्या ११ आत्मघातकी हल्लेखोरांचा समावेश आहे. दरम्यान, स्थानिक बलोच नागरिकांनी शत्रूपासून दूर राहावे आणि परिसरात सक्रिय असलेल्या सैनिकांना मदत करावी असं आवाहन बीएलएने केलं आहे.

बीएलएने केलेल्या दाव्यानुसार २०० जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र शत्रूचं यापेक्षा अधिक नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आणि मालमत्तेच्या नुकसानीबाबत पूर्ण विवरण योग्यवेळी प्रसारमाध्यमांसमोर आणलं जाईल, असा दावाही बीएलएने केला आहे. सद्यस्थिती बलुचिस्तानमधील या भागात तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे.

याबरोबरच बलूच लिबरेशन आर्मीने आपल्या १८ सैनिकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यामध्ये माजिद ब्रिगेडचे ११ आत्मघाती हल्लेखोर, फतेह स्क्वॉडचे ४ सैनिक  आणि एसटीओएस यूनिटमधील ३ सैनिकांचा समावेश आहे.

दरम्यान, बीएलएसोबत सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत ७० अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, देशाचे रक्षण करताना १० सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानमधील प्रशासनाने दिली होती.  

Web Title : ऑपरेशन हेरॉफ: बीएलए का दावा, 200 पाकिस्तानी सैनिक मारे, 17 पकड़े

Web Summary : बलूचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने ऑपरेशन हेरॉफ में 200 से अधिक पाकिस्तानी सैनिकों को मारने और 17 को पकड़ने का दावा किया है। कुछ क्षेत्रों में लड़ाई जारी है, बीएलए ने 11 आत्मघाती हमलावरों सहित 18 हताहतों की पुष्टि की। पाकिस्तान ने 70 आतंकवादियों और 10 सुरक्षा कर्मियों के मारे जाने की सूचना दी।

Web Title : BLA Claims 200 Pakistani Soldiers Killed, 17 Captured in Operation

Web Summary : Balochistan Liberation Army (BLA) claims to have killed over 200 Pakistani soldiers and captured 17 during Operation Herof. Fighting continues in some areas, with BLA confirming 18 casualties, including 11 suicide attackers. Pakistan reports 70 militants killed and 10 security personnel dead.