होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 06:37 IST2026-04-06T06:36:20+5:302026-04-06T06:37:19+5:30

अमेरिका- वीज प्रकल्प, वाहतूक व्यवस्था उद्ध्वस्त करू! | इराण- ट्रम्प अमेरिकेतील प्रत्येकाला नरकात ढकलत आहेत!

Open Hormuz, otherwise you will rot in hell! Trump slips up, threatens a major attack on Iran in Shivral language | होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी

होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी

वॉशिंग्टन/इस्तंबूल : जर मंगळवारपर्यंत हा होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली नाही, तर इराणचे वीज प्रकल्प, वाहतूक व्यवस्था सर्व उद्ध्वस्त केले जातील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. सोशल मीडियावर याची पोस्ट टाकताना त्यांनी त्यात अत्यंत शिवराळ भाषा वापरली. या भाषेची जगभरात निंदा केली जात आहे. 

ट्रम्प यांनी आपल्या धमकीत इराणच्या नेतृत्त्वाचा उल्लेख 'डोके फिरलेले नराधम' (क्रेझी बास्टर्ड्स) असा करत यांनी (इराणने) होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी वाहतुकीसाठी खुली केली नाहीत तर त्यांची जागा नरकात असेल असे जहाल शब्द वापरले आहेत.

अमेरिका हतबल व घाबरलेली आहे. ४७ वर्षांत अमेरिका इराणचे काही वाईट करू शकली नाही व त्यांना ते यापुढेही जमणार नाही, असे  प्रत्युत्तर इराणने दिले. ट्रम्प यांच्या बेजबाबदार पावलांमुळे प्रत्येक अमेरिकी कुटुंब जिवंत नरकात ढकलले जात आहे. हा खेळ थांबवा. युद्धगुन्ह्यांद्वारे तुम्हाला काहीही मिळणार नाही, असा इशारा इराणने दिला आहे.

अमेरिकेने इराणमध्ये घुसून शोधला सैनिक

अमेरिकेने इराणध्ये घुसून आपल्या सैनिकाला शोधून काढले. इराणमधील डोंगराच्या कपारीत २४ तासांहून अधिक काळ तो इराणच्या सैन्यापासून लपून बसला होता. त्याचा ठावठिकाणा सीआयए शोधला. त्यांनी हे लोकेशन तातडीने पेंटागॉनला कळवले. त्यानंतर ट्रम्प यांच्या आदेशानुसार, अमेरिकेने डझनभर विमाने व हेलिकॉप्टर्स इराणच्या आकाशात पाठवली. ते इराणच्या डोंगराळ भागात अत्यंत खालून टेहाळणी करत वैमानिकापर्यंत पोहोचले. यावेळी चकमकही झाली. पण, अखेर अमेरिकेने आपल्या सैनिकाला वाचविले.

इराण विमातळावर हल्ले

अल्टिमेटमची मुदत संपत असतानाच अमेरिका आणि इस्रायलने इराणवर थेट लष्करी कारवाई सुरू केली आहे. इराणमधील अहवाज शहरातील 'कासिम सुलेमानी आंतराष्ट्रीय विमानतळाला टार्गेट केले आहे. इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरूतवर एकाच दिवसात सात वेळा हल्ला केला.

इराणने पाडली अमेरिकेची २ हेलिकॉप्टर?

सैनिकाचे रेस्क्यु ऑपरेशन सुरू असताना अमेरिकेची २ 'ब्लॅक हॉक' हेलिकॉप्टर व एक मालवाहतूक विमान पाडल्याचा दावा इराणने केला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ इराणने प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेचे एक ड्रोनही पाडल्याचा दावा इराणने केला आहे. मात्र, इराणला तंत्रज्ञान मिळू नये यासाठी अमेरिकेनेच आपली विमाने उडवल्याचे सांगितले जाते. 

इराणमध्ये मंगळवार हा 'पॉवर प्लांट डे' आणि 'ब्रिज डे' असेल... दोन्ही एकाच दिवशी! असं यापूर्वी कधीही घडलं नसेल!!! डोके फिरलेल्या नराधमांनो, ती फxx सामुद्रधुनी तत्काळ उघडा, नाहीतर तुम्ही नरकात सडाल. फक्त पाहत राहा! 
-डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

Web Title : ट्रम्प ने होर्मुज जलडमरूमध्य बंद करने पर ईरान को विनाशकारी हमले की धमकी दी

Web Summary : ट्रम्प ने ईरान को होर्मुज जलडमरूमध्य खोलने या विनाश का सामना करने की चेतावनी दी। ईरान ने अमेरिका की बेबसी का हवाला देते हुए जवाबी हमला किया। इसके बाद अमेरिकी सैन्य कार्रवाई हुई, जिसमें एक बचाव अभियान और ईरानी हवाई अड्डों पर हमले शामिल थे। ईरान ने अमेरिकी विमानों को मार गिराने का दावा किया।

Web Title : Trump Threatens Iran with Devastating Attack over Hormuz Strait Closure

Web Summary : Trump warned Iran to open the Hormuz Strait or face destruction. Iran retaliated, citing America's helplessness. US military actions followed, including a rescue operation and alleged strikes on Iranian airports. Iran claimed downing US aircraft.