शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

ओडिशातील शाळांत ऑनलाइन वर्ग, ‘यूएई’मध्ये Online विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 05:38 IST

कोरोना साथीच्या मुकाबल्यासाठी लोकांच्या सार्वजनिक वावरावर संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) काही निर्बंध लादले आहेत.

भुवनेश्वर : कोरोनाची साथ व त्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ओडिशातील सरकारी शाळांतल्या १० वीच्या विद्यार्थ्यांचे आॅनलाइन वर्ग घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने खासगी शिक्षणसंस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी याआधीच आॅनलाइन वर्ग सुरू केले आहेत. मात्र, संसाधनांची कमतरता असल्यामुळे सरकारी शाळांना असे वर्ग सुरू करणे शक्य होत नव्हते. पण, आता ती त्रुटी दूर झाली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री समीर रंजन दास यांनी सांगितले की, यंदाच्या शैक्षणिक वर्षात सरकारी शाळांतील दहावीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणासाठी सज्ज राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी अध्यापनाच्या नवनव्या पद्धती वापरण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे. ओडिशातील लॉकडाउनची मुदत राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत वाढविली आहे. तसेच, शिक्षणसंस्था १७ जूनपर्यंत बंद राहाणार आहेत. लॉकडाऊनमुळे नवी पाठ्यपुस्तके मिळण्यास विलंब लागणार असल्याचे ओडिशा सरकारने म्हटले आहे.‘दिशा अ‍ॅप’चा वापरओडिशातील सरकारी शाळांतल्या १० वीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिकविण्यासाठी शिक्षक दिशा अ‍ॅपचा वापर करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन शिक्षणासाठी हे अ‍ॅप केंद्र सरकारने तयार केले आहे.

‘यूएई’मध्ये होणार आॅनलाइन विवाहदुबई : कोरोना साथीच्या मुकाबल्यासाठी लोकांच्या सार्वजनिक वावरावर संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या कालावधीत जोडप्यांना आॅनलाइन विवाह करण्यास संयुक्त अरब अमिरातीने परवानगी दिली आहे. यासंदर्भात, न्याय खात्याने सांगितले की, कागदपत्रे सादर केल्यानंतर विवाहासाठी एक विशिष्ट तारीख ठरवून धर्मगुरूंच्या साक्षीने आॅनलाइन पद्धतीने विवाह पार पाडण्याची मुभा देण्यात आली आहे. जोडप्याने कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रियाही आॅनलाइनच करावयाची आहे. या आॅनलाइन विवाहप्रसंगी धर्मगुरूवधू व वराची; तसेच साक्षीदारांची ओळख पटवेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाmarriageलग्नonlineऑनलाइन