७ पैकी एका मुलाचे शिक्षण नैसर्गिक आपत्ती, हवामान संकटामुळे थांबले, कोट्यवधी मुले शिक्षणापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 06:48 IST2025-01-25T06:47:45+5:302025-01-25T06:48:01+5:30

Education: पूर, भूस्खलन आणि चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटेचा भारताचा जगभरात फटका बसत असून, यामुळे जगभरात २४.२ कोटी मुलांना, तर भारतातील ५ कोटी ४७ लाख मुलांना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे.

One in 7 children's education interrupted by natural disasters, climate crises | ७ पैकी एका मुलाचे शिक्षण नैसर्गिक आपत्ती, हवामान संकटामुळे थांबले, कोट्यवधी मुले शिक्षणापासून वंचित

७ पैकी एका मुलाचे शिक्षण नैसर्गिक आपत्ती, हवामान संकटामुळे थांबले, कोट्यवधी मुले शिक्षणापासून वंचित

 नवी दिल्ली - पूर, भूस्खलन आणि चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटेचा भारताचा जगभरात फटका बसत असून, यामुळे जगभरात २४.२ कोटी मुलांना, तर भारतातील ५ कोटी ४७ लाख मुलांना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. ७ पैकी एका मुलाचे शिक्षण हवामान संकटामुळे थांबले असल्याचे युनिसेफने म्हटले आहे. हवामान बदलांमुळे आलेल्या आपत्तींचा आशिया, आफ्रिका खंडातील गरीब देशांतील विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसला. 

भारत झाला अत्यंत संवेदनशील देश
भारत हा हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील देश आहे. २०२१ च्या युनिसेफ चिल्ड्रेन क्लायमेट रिस्क इंडेक्सनुसार, भारत १६३ देशांत २६ व्या स्थानावर आहे.
पूर, भूस्खलन आणि चक्रीवादळ यांसारख्या जलद उद्भवणाऱ्या आपत्तींमुळे शाळांचे वारंवार नुकसान होत आहे, तर प्रचंड उष्णता आणि वायुप्रदूषण यांसारखे पर्यावरणीय ताण मुलांच्या आरोग्यास हानी पोहोचवत असून, मुलांच्या शालेय उपस्थिती तसेच शैक्षणिक प्रगतीत अडथळा आणत आहेत. 

११.८ कोटी मुलांना आले शिक्षणात अडथळे
दक्षिण युरोप, आशिया, आफ्रिकेत पूर, चक्रीवादळे होतात. मात्र, तिथे गेल्यावर्षी उष्णतेच्या लाटेमुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या. एप्रिलमध्ये प्रतिकूल हवामान, नैसर्गिक आपत्तींमुळे ११.८ कोटी मुलांच्या शालेय शिक्षणात अडथळे आले. आशियात उष्णतेच्या लाटेमुळे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. 

१२.३ कोटी विद्यार्थ्यांवर कोणत्या महिन्यात कोणते संकट आले? 
जानेवारी वादळ
फेब्रुवारी पूर
मार्च पूर
एप्रिल उष्णतेची लाट
मे उष्णतेची लाट
जून उष्णतेची लाट
जुलै उष्णतेची लाट
ऑगस्ट चक्रीवादळ
सप्टेंबर चक्रीवादळ
ऑक्टोबर चक्रीवादळ
नोव्हेंबर वादळ
डिसेंबर चक्रीवादळ

२४.२ कोटी
फटका बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७४ टक्के विद्यार्थी हे कमी आणि निम्न-मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमधील आहेत.
१७.१ कोटी
विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटा हा शालेय शिक्षणात व्यत्यय आणणारा सर्वांत मोठा हवामान धोका ठरला.
११ कोटी
मुलांना हवामान बदलाचा सर्वाधिक फटका एप्रिलमध्ये बसला. यात बांगलादेश, कंबोडिया, भारत, फिलिपिन्स आणि थायलंडमधील मुलांचा समावेश आहे.

८५ देश किंवा प्रदेशांमध्ये शाळा हवामानाशी संबंधित धोक्यांमुळे प्रभावित झाल्या, तर २३ देशांना अनेक वेळा शाळा बंद कराव्या लागल्या.
१८ देशांना सप्टेंबर महिन्यात हवामानाशी संबंधित बदलांमुळे शाळा सुरू करण्यात मोठा फटका बसला. यागी वादळामुळे पूर्व आशियात फटका बसला.

हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या संकटांमुळे लोकांना गंभीर संकटांना सामोरे जावे लागते. त्यातून शाळेत जाणारे विद्यार्थीही सुटलेले नाहीत. ते शाळेत जाऊ शकत नसल्याने शिक्षणापासून वंचित राहतात. - कॅथरीन रसेल,  कार्यकारी संचालक, युनिसेफ.

Web Title: One in 7 children's education interrupted by natural disasters, climate crises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.