एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 09:27 IST2026-04-09T09:24:37+5:302026-04-09T09:27:21+5:30

Iran War News: अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान काल दोन आठवड्यांचा युद्धविराम लागू झाला होता. त्यानंतर आता जगभरातील इंधन वाहतुकीचा प्रमुख मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी इराणने प्रयत्न सुरू केले आहेत.

One dollar per barrel, plus..., Iran's rule for toll on Hormuz | एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   

एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान काल दोन आठवड्यांचा युद्धविराम लागू झाला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंनी आपापल्या विजयाचे दावे करण्यात येत आहेत. यादरम्यान जगभरातील इंधन वाहतुकीचा प्रमुख मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी इराणने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याबरोबरच होर्मुझमधून प्रवास करणाऱ्या तेलवाहू जहाजांकडून एक डॉलर प्रति बॅरल दराने टोल आकारण्याची योजना आखली आहे. एवढंच नाही तर ते क्रिप्टोकरंसीमध्ये वसूल करण्याची तयारी इराणने केली आहे.

अमेरिका-इस्राइल विरुद्ध इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामध्ये अल्पकाळासाठी युद्धविराम जाहीर झाल्यानंतर जगभरातील बाजारांची नजर ही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जलमार्गाकडे लागली आहे. युद्धविरामामुळे अमेरिका आणि इराणमधील संघर्ष थांबला असला तरी इराण होर्मुझमधील आपलं वर्चस्व सोडण्यास तयार नाही आहे. तसेच या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाची कसून तपासणी केली जाणार आहे, जहाजातील सामानाची पूर्ण तपासणी केल्यानंतरच या जहाजाला पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल, असे  इराणच्या तेल आणि गॅस निर्यात संघाने सांगितले आहे. युद्धविरामाच्या दोन आठवड्यांच्या काळाचा वापर हत्यारांची वाहतूक करण्यासाठी तर केला जात नाही आहे ना, याची खातरजमा करण्यासाठी जहाजांची तपासणी केली जाणार आहे, असे इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

इराणने लागू केलेल्या नव्या नियमावलीनुसार प्रत्येक जहाजाला एका ईमेलमधून जहाजातील प्रत्येक सामानाबाबत सविस्तर माहिती इराणला द्यावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित जहाजावर किती टोल आकारावा याचा निर्णय अधिकारी घेतील. तसेच टोल भरण्यासाठी खूप कमी वेळ दिली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जहाजांना किती वेळ लागला तरी हरकत नाही, आम्हाला कुठलीही घाई नसेल, असेही इराणने स्पष्ट केले आहे.  

Web Title : होरमुज़ जलडमरूमध्य से गुजरने पर ईरान का टोल: एक डॉलर प्रति बैरल

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच, ईरान होरमुज़ जलडमरूमध्य पर नियंत्रण चाहता है। वे जहाजों से $1/बैरल वसूलने की योजना बना रहे हैं, संभवतः क्रिप्टोकरेंसी में। युद्धविराम के बाद सुरक्षा कारणों का हवाला देते हुए सख्त निरीक्षण की योजना है। जहाजों को पारगमन से पहले कार्गो का विवरण देना होगा; देरी की उम्मीद है।

Web Title : Iran to Charge Dollar Per Barrel, Crypto for Hormuz Passage

Web Summary : Amid US-Iran tensions, Iran eyes control of Hormuz Strait. They plan to charge ships $1/barrel, potentially in cryptocurrency. Stricter inspections are planned, citing security concerns after a ceasefire. Ships must detail cargo before transit; delays are expected.