जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
By संतोष कनमुसे | Updated: October 11, 2025 14:18 IST2025-10-11T14:16:44+5:302025-10-11T14:18:34+5:30
पाकिस्तानमध्ये काही दिवसांपासून हिंसक घटना वाढल्या आहेत. या घटनांमागे 'तहरीक-ए-लब्बैक' या संघटनेचा हात आहे.

जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांपासून हिंसक घटना वाढल्या आहेत. आधी पाकिस्तानी लष्कराच्या जवळची आणि लाडकी संघटना असणारी 'तहरीक-ए-लब्बैक' ही संघटना आता पाकिस्तान सरकारच्या डोक्यावर बसल्याचे दिसत आहे. या संघटनेने लाहोरमध्ये मोठा गोंधळ सुरू केला आहे. लष्कराने जे पेराल तेच उगवले आहे.
या संघटनेला पाकिस्तानी सैन्यानेच मोठे केले होते. नागरी सरकारांना दडपण्यासाठी "स्ट्रीट फोर्स" तयार करणे हा यामागील उद्देश होता. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांसोबत पाकिस्तानने भारताविरुद्ध हाच दृष्टिकोन स्वीकारला होता. पण आता या संघटनांनी पाकिस्तानमध्येच हिंसा वाढवली आहे.
लंडनमधील पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ आजकिया म्हणाले की, "लष्कर-ए-तैयबाप्रमाणेच, टीएलपी ही पाकिस्तानी सैन्याने तयार केलेली संघटना आहे.
लष्कराने ती देशांतर्गत राजकारण हाताळण्यासाठी तयार केली." आता, ती संघटना पाकिस्तानसाठी डोकेदुखी बनली आहे.
शनिवारी लाहोरमध्ये तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान मोठे निदर्शने सुरू आहेत. हजारो समर्थक या निदर्शनात सामील झाले आहेत आणि इस्लामाबादकडे कूच करत आहेत. टीएलपीचे संस्थापक खादिम हुसेन रिझवी यांनी आरोप केला आहे की, निदर्शनादरम्यान त्यांचे ११ समर्थक मारले गेले.
लष्कराचा दुहेरी खेळ
२०१५ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेने पाकिस्तानला वारंवार त्रास दिला आहे. २०१७ मध्ये त्यांनी २१ दिवस इस्लामाबादला वेढा घातला. ज्यावेळी ही संघटना अडचणी निर्माण करते तेव्हा पाकिस्तानी सैन्य 'मध्यस्थ' म्हणून काम करते आणि त्यांच्याशी वाटाघाटी करते. तहरीक-ए-लब्बैक हा उर्दू शब्द आहे. तहरीक म्हणजे 'चळवळ' आणि 'लब्बैक' म्हणजे 'उपस्थित' असा आहे.
२०१७ च्या निदर्शनांदरम्यान, एक वरिष्ठ लष्करी अधिकारी टीएलपी निदर्शकांना पैसे वाटताना दिसला. त्यावेळी तत्कालीन कायदा मंत्री जाहिद हमीद यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले होते.