PM Modi in UN : "भारतीय स्वातंत्र्याचं 75वं वर्ष; या वर्षात आम्ही विद्यार्थ्यांनी तयार केलेले 75 उपग्रह अवकाशात सोडणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 07:17 PM2021-09-25T19:17:14+5:302021-09-25T20:01:23+5:30

PM Narendra Modi at United Nations General Assembly : भारताची प्रगती होते, तेव्हा जगाची प्रगती होते. भारतात बदल होतात, तेव्हा जगात बदल पाहायला मिळतात असं संयुक्त राष्ट्राच्या सभेत नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

ocassion of 75 years of independence, India going to launch 75 satellites into space made by Indian students says Narendra Modi | PM Modi in UN : "भारतीय स्वातंत्र्याचं 75वं वर्ष; या वर्षात आम्ही विद्यार्थ्यांनी तयार केलेले 75 उपग्रह अवकाशात सोडणार"

PM Modi in UN : "भारतीय स्वातंत्र्याचं 75वं वर्ष; या वर्षात आम्ही विद्यार्थ्यांनी तयार केलेले 75 उपग्रह अवकाशात सोडणार"

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संयुक्त राष्ट्र महासभेला (United Nations General Assembly) संबोधित करत आहेत. कोरोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्यांना पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली. भारताची प्रगती होते, तेव्हा जगाची प्रगती होते. भारतात बदल होतात, तेव्हा जगात बदल पाहायला मिळतात असं संयुक्त राष्ट्राच्या सभेत नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तसेच कोरोना संकटात भारतानं अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी 'आत्मनिर्भर भारत' अभियान राबवलं. भारतात आता डिजिटल युग सुरू झाल्याचं देखील सांगितलं. याच दरम्यान त्यांनी UNमध्ये एक मोठी घोषणा केली आहे. "भारतीय स्वातंत्र्याचं यंदा 75 वं वर्ष आहे. या वर्षात आम्ही भारतीय विद्यार्थ्यांनी तयार केलेले 75 उपग्रह अवकाशात सोडणार" असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. 

भारत 'सेवा परमो धर्मा'अंतर्गत लसीकरण करण्यात गुंतलेला आहे. भारताने जगातील पहिली डीएनए आधारित लस तयार केली आहे. लसीची निर्यात देखील पुन्हा सुरू झाली आहे असं मोदींनी म्हटलं आहे. अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी होऊ नये, यासाठी सगळ्यांनीच सतर्क राहण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या सभेत केलं. अफगाणिस्तानचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ द्यायचा नसेल, तर आपण सजग राहायला हवं. जे दहशतवादाचा वापर करत आहेत, त्यांनादेखील दहशतवादाचा फटका बसू शकतो, ही बाब त्यांनी लक्षात ठेवावी, अशा शब्दांत मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला.

जे दहशतवादाचा वापर करताहेत...; पंतप्रधान मोदींचा UNमधून पाकिस्तानला स्पष्ट इशारा

अफगाणिस्तान, दहशतवाद, कोरोना संकट, लसीकरण, हवामान बदल अशा विविध मुद्द्यांवर मोदींनी संयुक्त राष्ट्राला संबोधित केलं. जगात सध्या अनेक ठिकाणी दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. छुपी युद्धं सुरू आहेत. अफगाणिस्तानमधील परिस्थिती वाईट आहे. तिथल्या जनतेला, महिलांना, लहान मुलांना, अल्पसंख्याकांना मदतीची गरज आहे. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडावी लागेल, असं मोदी म्हणाले.

जगासमोर कट्टरतावादाचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत वैज्ञानिक दृष्टीकोन, प्रगतीशील विचार वाढायला हवेत. समुद्र हा आपल्याकडे असणारा मोठा नैसर्गिक ठेवा आहे. त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. आपण समुद्रातील संसाधनांचा वापर करायला हवा, गैरवापर करू नये. आंतरराष्ट्रीय व्यापारात समुद्र आपल्यासाठी लाईफलाईन आहेत. त्यामुळे आपण समुद्रांना विस्तारवादाच्या स्पर्धेपासून दूर ठेवायला हवं, असं मत मोदींनी व्यक्त केलं. 


 

English summary :
ocassion of 75 years of independence, India going to launch 75 satellites into space made by Indian students says Narendra Modi

Web Title: ocassion of 75 years of independence, India going to launch 75 satellites into space made by Indian students says Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app