रुग्णांची सेवा करता करता नशीब फळफळले; नर्स बनली 45 कोटींची मालकीन, जाणून घ्या कशी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 17:36 IST2021-08-07T17:35:04+5:302021-08-07T17:36:03+5:30
Lotto Jackpot won nurse: जगातील काही लोकांचे नशीब एका लॉटरीमुळे बदलून जाते आणि ते झटक्यात करोडपती होतात. हे आपल्या आजुबाजुला कमी दिसत असले तरी लॉटरीमध्ये पैसे लावण्याच्या नादामुळे अनेकांची घरेदारे उघड्यावर पडल्याची देखील उदाहरणे आहेत.

रुग्णांची सेवा करता करता नशीब फळफळले; नर्स बनली 45 कोटींची मालकीन, जाणून घ्या कशी...
कोणाचा कधी भाग्योदय होईल सांगता येत नाही. कोण कधी रावाचा रंक होईल आणि कोण कधी राव होईल हे कोणालाच माहिती नाही. यामुळे कर्म करत रहायचे, जेव्हा मिळायचे तेव्हा मिळेल. अशीच एका हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा करणाऱ्या नर्सच्या बाबतीत घडले आहे. ती रातोरात करोडोंची मालकीन झाली आहे. (Nurse and Lidl worker win £5.1million Lotto jackpot - and have big spending plans)
जगातील काही लोकांचे नशीब एका लॉटरीमुळे बदलून जाते आणि ते झटक्यात करोडपती होतात. हे आपल्या आजुबाजुला कमी दिसत असले तरी लॉटरीमध्ये पैसे लावण्याच्या नादामुळे अनेकांची घरेदारे उघड्यावर पडल्याची देखील उदाहरणे आहेत. 5.1 दशलक्ष्य युरो म्हणजेच 44,69,12,588 रुपयांचा लोट्टो जॅकपॉट जिंकणाऱ्या या नर्सचे भाग्य फळफळले आहे. या दांम्पत्याने सांगितले की, ते आता त्यांची स्वप्ने पूर्ण करणार आहेत. लॉटरीमध्ये जिंकलेल्या पैशांतून ते आता लक्झरी कार खरेदी करतील आणि फिरायला जातील.
दैवाने दिले होते, पण...! सनूप सुनिलला युएईमध्ये 30 कोटींचा जॅकपॉट लागला; आयोजक फोन करून वैतागले
पॉल आणि पेशाने नर्स असलेली लईस ड्रेक दोघांनी 28 जुलैच्या लॉटरी ड्रॉमध्ये सर्व सहा आकडे मिळविण्यास यश मिळविले होते. यानंतर त्यांना लोट्टो जॅकपॉटचे विजेते घोषित करण्यात आले. लुईसला दोन मुले आहेत आणि ती एका हॉस्पिटलमध्ये काम करते. लॉटरीतून जिंकलेल्या पैशातून ती आपल्या मुलांना फ्लोरिडा आणि कुटुंबाला न्यूयॉर्क शहर फिरविणार आहे.
पॉल आणि लुईस यांनी स्थानिक वन स्टॉपवरून लकी डीप तिकीटावरून सर्व मुख्य अंक 23, 26, 34, 36, 44 आणि 59 मिळविले होते. त्यांनी ड्रॉमध्ये 5,162,779 चा स्कोअर केला होता. यामुळे त्यांना जॅकपॉट जिंकण्य़ास यश मिळाले.
जॅकपॉट जिंकल्याचे समजल्यानंतर पॉल यांनी सांगितले की, मी भावूक नाहीय पण हे ऐकल्यानंतर मला धक्का बसला. मी रडू लागलो. मोठमोठ्याने ओरडत घराकडे धावलो. लुईसला हे सांगण्यासाठी तिला झोपेतून उठविले. आम्हाला विश्वासच बसत नव्हता. सकाळी उठून पहिले माझे ऑफिस गाठले आणि सांगितले मी आज काम करू शकणार नाही.