दैवाने दिले होते, पण...! सनूप सुनिलला युएईमध्ये 30 कोटींचा जॅकपॉट लागला; आयोजक फोन करून वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 03:19 PM2021-08-04T15:19:54+5:302021-08-04T15:20:22+5:30

UAE Sanoop Sunil Big Ticket Winner: आयोजक सुनिल यांना सतत फोन करत होते. परंतू त्यांचा फोन लागत नव्हता. आयोजक वैतागले होते.

Indian national Sanoop Sunil wins Dhs15 million in Abu Dhabi’s Big Ticket jackpot | दैवाने दिले होते, पण...! सनूप सुनिलला युएईमध्ये 30 कोटींचा जॅकपॉट लागला; आयोजक फोन करून वैतागले

दैवाने दिले होते, पण...! सनूप सुनिलला युएईमध्ये 30 कोटींचा जॅकपॉट लागला; आयोजक फोन करून वैतागले

Next

अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातमध्ये एका भारतीयाचे नशीब फळफळले आहे. अबुधाबीमध्ये मंगळवारी बिग तिकिट रॅफल ड्रॉ  सिीज नंबर 230 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतात राहणाऱ्या सनूप सुनिलने Dh15 दशलक्ष जिंकले आहेत. भारतीय चलनानुसार ही रक्कम 30 कोटींहून अधिक आहे. (Big Ticket Abu Dhabi: 20 Indian expats from Qatar to share Dh15m raffle win) 

सुनीलने हे 183947 नंबरचे तिकिट 13 जुलैला खरेदी केले होते. बिग तिकिटच्या रिचर्ड यांनी सुनिलला अनेकदा फोन केला. मात्र, त्यांचा फोन लागत नव्हता. अनेकदा प्रयत्न केल्यावर अखेर त्यांचा फोन लागला, रिंग वाजली, पलिकडून आवाज आला, काही सेकंदांत कट झाला. रिचर्डने या काळात जॅकपॉट जिंकल्याचे कळविले, परंतू दुसऱ्या बाजुने काहीच आवाज आला नाही. 

आयोजक सुनिल यांना सतत फोन करत होते. परंतू त्यांचा फोन लागत नव्हता. आयोजक वैतागले होते.  तिसऱ्या नंबरचे बक्षीस अबुधाबीच्या जॉन्सन कुंजकुंजू यांनी जिंकले आहे. त्यांना Dh1 दशलक्ष मिळणार आहेत. म्हणजेच याची किंमत 20 कोटींच्या आसपास होते. याचप्रकारे 2019 मध्ये 28 वर्षांच्या एका भारतीय कर्मचाऱ्याचे नशीब रातोरात पालटले होते. श्रीनु श्रीधरन याने Dh15 दशलक्षांचे बक्षीस जिंकले होते. तो एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याला महिन्याला Dh1,500 पगार होता. 

अखेर सनूपला मित्रांकडून कळले...
सनूपने आपला आणि पत्नीचा भारतीय नंबरही दिला होता. परंतू ते लागत नव्हते. जेव्हा लॉटरी फुटली तेव्हा तेथील माध्यमांमध्ये नावे प्रसिद्ध झाली. सनूपचे नाव त्याच्या काही मित्रांनी वाचले आणि त्याला कळविले. सनूप कतारमध्ये काम करत होता. त्याचा फोन जेव्हा रेंजमध्ये आला तेव्हा त्याच्या ग्रुपवर मेसेज पडले होते. त्याने वाचल्यानंतर आयोजकांशी संपर्क केला. हे तिकिट त्याच्यासोबत काम करणाऱ्या 20 जणांच्या ग्रुपने मिळून खरेदी केले होते. यामुळे मोठा वाटा सनूपकडे ठेवून बाकीचे पैसे 19 जणांमध्ये वाटण्यात येणार आहेत, असे समजते. 

Web Title: Indian national Sanoop Sunil wins Dhs15 million in Abu Dhabi’s Big Ticket jackpot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app