शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

आता पॅलेस्टाइनचा इस्रायलवर 'पतंगहल्ला', 2200 एकर शेत नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 16:13 IST

गलोल, पेटते बोळे, चाकू हल्ले यांच्यानंतर पॅलेस्टाइनने पतंगाद्वारे हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.

जेरुसलेम- इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यामध्ये सुरु असलेल्या लढाईने आता नवे रुप धारण केले आहे. गलोलीने दगड फेकणे, पेटत्या बाटल्या फेकणे असे प्रकार पॅलेस्टाइनकडून होत होते. मात्र आता पॅलेस्टाइनने पतंगाला आगीची गोळे बांधून इस्रायलच्या दिशेने सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे इस्रायलमधील शेतांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

पॅलेस्टाइनतर्फे शोधल्या गेलेल्या या नव्या अस्त्राला इस्रायलने काईट टेररिझम असे नाव दिले आहे. या काईट टेररिझमला आम्ही घाबरत नाही, यामुळे आमच्या शत्रूची स्थिती किती दयनीय असेल हे दिसतं असं विधान इस्रायलचे कॅबिनेटमंत्री हांगेबी यांनी केलं आहे. यामुळे माणसांना कोणताही धोका नाही त्यावर लवकरच उपाय शोधून काढू असंही ते म्हणाले. इस्रायलच्या नागरिकांनी या पतंगहल्ल्याला आजिबात घाबरु नये , त्यावर तोडगा काढण्यासाठी थोडा वेळ लागेल. विमान अपहरणस आत्मघातकी हल्ला, रॉकेट हल्ला, चाकूहल्ला या सगळ्यांवर आम्ही उपाय शोधून काढले आहेत तसाच यावरही उपाय शोधून काढण्याचं काम सुरु आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलं आहे.

मार्च महिन्यापासून या हल्ल्यांमुळे शेकडो एकर शेत जळून खाक झाले आहे. इस्रायल हा देश त्यांच्या शेतीतील प्रगतीसाठी ओळखला जातो. आजवर रहिवासी जागांवर हल्ला करणाऱ्या पॅलेस्टाइनच्या नागरिकांनी आता इस्रायलचे कृषी क्षेत्र लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत असे आगीचे गोळे जोडलेले 600 पतंग पॅलेस्टाइनने सोडले आहेत. त्यापैकी 400 पतंग हवेतच निकामी करण्यात इस्रायलच्या सुरक्षा दलांना यश आले आहे. मात्र 200 पतंगांनी इस्रायलमधील शेतजमिनीस आग लावली असून 2200 एकर शेत नष्ट झाले आहे.

टॅग्स :Palestineपॅलेस्टाइनIsraelइस्रायलwarयुद्ध