आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 22:56 IST2025-09-17T22:55:02+5:302025-09-17T22:56:13+5:30
या यादीत, अफगाणिस्तान, बहामास, बेलीज, बोलिव्हिया, मानमार, चीन, कोलंबिया, कोस्टा रिका, डोमिनिकन रिपब्लिक, इक्वाडोर, एल साल्व्हाडोर, ग्वाटेमाला, हैती, होंडुरास, भारत, जमैका, लाओस, मेक्सिको, निकाराग्वा, पाकिस्तान, पनामा, पेरू आणि व्हेनेझुएला यासारख्या देशांचा समावेश आहे...

आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. त्यांनी, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि म्यानमार यांसारख्या देशांसोबतच भारताचा समावेश, अशा 23 देशांच्या यादीत केला आहे, ज्यांना ड्रग ट्रान्झिट आणि अवैध नेशेच्या पदार्थांच्या उत्पादनांसाठी जबाबदार धरले गेले आहे. म्हणजेच, भारतातून आपल्या देशात ड्रग्स येत आहे, असे ट्रम्प यांना म्हणायचे आहे. ट्रम्प यांनी ही यादी ‘प्रेसिडेंशियल डिटरमिनेशन’ अंतर्गत काँग्रेसला पाठवताना म्हटले आहे की, या देशांतून येणारी नशेची औषधं आणि रसायनांची तस्करी अमेरिकेच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका आहे. विशेषतः फेंटेनाइल आणि इतर सिंथेटिक ओपिओइड्समुळे अमेरिकेत गंभीर आरोग्य संकट निर्माण झाले आहे.
या यादीत, अफगाणिस्तान, बहामास, बेलीज, बोलिव्हिया, मानमार, चीन, कोलंबिया, कोस्टा रिका, डोमिनिकन रिपब्लिक, इक्वाडोर, एल साल्व्हाडोर, ग्वाटेमाला, हैती, होंडुरास, भारत, जमैका, लाओस, मेक्सिको, निकाराग्वा, पाकिस्तान, पनामा, पेरू आणि व्हेनेझुएला यासारख्या देशांचा समावेश आहे. दरम्यान, यादीत एखाद्या देशाचा समावेश होणे, हे त्या देशाचे सरकार नशेच्या पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांत कमी पडले, असे नाही. खरे तर, सरकारे कठोर प्रयत्न करत असली तरी, भौगोलिक, व्यापारी आणि आर्थिक परिस्थितींमुळे या देशांमधून नशेच्या पदार्थांची तस्करी होते, असे व्हाइट हाउसने स्पष्ट केले आहे.
ट्रम्प यांनी प्रामुख्याने, अफगाणिस्तान, बोलिव्हिया, म्यानमार, कोलंबिया आणि व्हेनेझुएला या देशांवर अधिक नाराजी व्यक्त करत, हे देश गेल्या वर्षात आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.
चीन सर्वात मोठा स्रोत -
याच बरोबर, यात, चीनला फेंटेनाइलसाठी आवश्यक रसायनांचा पुरवठा करणारा जगातील सर्वात मोठा स्रोत म्हणण्यात आले आहे. तसेच, ड्रॅगनने या अवैध पुरवठा साखळ्या मोडून काढाव्यात आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी विनंती ट्रम्प यांनी चीनला केली आहे. याशिवाय, ते म्हणाले, नायटाझीन आणि मेथाम्फेटामाइन सारख्या सिंथेटिक नशेच्या पदार्थांचा प्रसार वैश्विक संकट बनले आहे. अमेरिका सरकार ने फेंटेनाइल आणि इतर घातक सिंथेटिक ड्रग्सला "राष्ट्रीय आणीबाणी" घोषित केले आहे.