Now China has also started a movement to save KP Sharma Oli as the Prime Minister | नेपाळी पंतप्रधानांची खुर्ची वाचवण्यासाठी चीन लागला कामाला; राजकीय हालचालींना वेग

नेपाळी पंतप्रधानांची खुर्ची वाचवण्यासाठी चीन लागला कामाला; राजकीय हालचालींना वेग

नेपाळमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या पंतप्रधानपदाच्या राजीनाम्यासाठी पक्षातंर्गत दबाव वाढू लागला आहे. पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या दबावानंतर ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी जोर धरु लागली आहे. मात्र केपी शर्मा ओली यांचं पंतप्रधानपद वाचवण्यासाठी आता चीनने देखील हालचाली सुरु केली आहे.

नेपाळने भारताच्या भूभागावर दावा करणारे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर केल्यानंतर नेपाळमधील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात दोन गट निर्माण झाले असून भारतविरोधी भूमिका घेतल्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे दिग्गज नेते पुष्प कमल दहल प्रचंड नाराज असल्याचे समोर आले. यानंतर केपी शर्मा ओली यांच्याकडे पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र त्यातच चीनच्या राजदूतांनी नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांची भेट चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.

चीनच्या राजदूत हाओ यांकी यांनी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माधव नेपाळ यांची रविवारी रात्री भेट घेतल्याचे वृत्त असून ओली यांना पाठिंबा देण्याची मागणी केले असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. त्यामुळे येत्या काही तासाच केपी शर्मा ओली यांची खुर्ची राहणार की जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, केपी शर्मा ओली सत्ता वाचवण्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतात. ते नेपाळ कम्युनिस्ट पक्षात फूट पाडू शकतात त्याचसोबत कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्येही पाठवू शकतात असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र अलीकडेच नेपाळ सरकारने जे निर्णय घेतले त्यानंतर सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात भारताचाही हात आहे. लिपुलेख, कालापानी व लिम्पियाधुरा हे भारताचे तीन भाग नेपाळच्या नकाशात समाविष्ट केल्यानंतर त्यांना हटविण्याच्या हालचारी सुरू झाल्या आहेत. त्यात नेपाळचे काही नेतेही सामील आहेत. पक्षाच्या मागील मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रचंड यांचा आरोप योग्य नाही, असे मत ओली यांच्याकडून मांडण्यात आले होते.

अन्य महत्वाच्या बातम्या- 

India China FaceOff: मोठी बातमी! गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य २ किलोमीटर माघारी

चीनला धक्का देण्याची तयारी; पंतप्रधान मोदी 'खास' माणसावर सोपवणार जबाबदारी?

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Now China has also started a movement to save KP Sharma Oli as the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.